Home विदर्भ पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने अंदोरी त झाला अनोखा विवाह सोहळा.!

पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने अंदोरी त झाला अनोखा विवाह सोहळा.!

46
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथील नान्हे व सेलसुरा येथील पचारे कुटूंबात सहा एप्रिल रोजी लग्ण विवाह ठरला होता.
पंरतु संचारबंदी व लाॅकडाउन झाल्यामुळे हा विवाह रद्द होते की काय ही भिती असतांना व लाॅकडाउन उठण्याची शक्यता नसल्यामुळे मुलीचे आईवडील गावातील पोलीस पाटील हेमंत ढोले यांचे कडे येवून लग्न सोहळ्यांबाबत बाबत चर्चा केली.
पोलिस पाटलांनी लगेचच ही बाब देवळी चे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या निदर्शनात आणुन दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या शी लेव्हरकर यांनी चर्चा केली व पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने शोशल डिस्टन्स चे भान ठेवून संचारबंदी चे उल्लंघन न होवू देता मुला मुलीच्या चेहर्यावर मास्क लावून विवाह मुहूर्ता नुसार आज ठरल्याप्रमाणे पोलीस चौकी समोरील प्राथमीक शाळेच्या पटांगणात पुजा शंकर नान्हे वय 19 व दर्शन कैलास पचारे वय 25 यांच्या एकमेकांच्या आयुष्यात एकञ येणार्या आनंदाचा क्षण पुढे जातो की काय ही भिती दोन्ही कुटूंबियांना असतानाच अनोखा विवाह पार पडला. व त्यांना लगेचच गावाला रवाना केले.
याक्षणी मुलामुलींच्या व आईवडिलांच्या चेहर्यावरचा आनंद माञ लपत नव्हता.
हा विवाह आई वडील सरपंच जयकुमार वाकडे पोलीस पाटील हेमंत ढोले , सामाजिक कार्यकर्ते सचिन कुराडकर व पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या साक्षीने काही अंतरावर उभे राहून पार पडला.