Home मुंबई कोरोना च्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना शेठ देवचंद जेठालाल हायस्कूल एस एस सी...

कोरोना च्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना शेठ देवचंद जेठालाल हायस्कूल एस एस सी २००२ गट मधिल विध्यार्थी कडुन अन्नधान्य वाटप

157
0

मुंबई प्रतिनिधी- रवि गवळी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जगामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असताना भारतामध्ये देखील या विषाणु मुळे मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असून यामुळे शासनातर्फे खबरदारी चा उपाय म्हणून लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे

उद्योग धंदे , कारखाने, छोटे – मोठे व्यवसाय, उद्योग, मजूरी, बंद झाल्यामुळे हातावर पोट असणारे अनेक मजूरदार, कामगार, बेकार झाल्यामुळे तांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मालाड पूर्व शेठ देवचंद जेठालाल हायस्कूल एस एस सी २००२ गट मधिल असणारे विध्यार्थी निरव रोलीया अल्पेश मिश्री धर्मेंद्र भाई चौशी विनय प्रजापती मिश्री अल्पेश जाजल धीरूभाई सोलंकी सहमित्रांनी पोटा वरचे हात असणाऱ्यांना गरजू कुटुंबाना आजपर्यंत ६०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु अन्य धान्य देवून दिलासा देण्याचा एक छोटासा प्रयत्न देवचंद हायस्कूल च्या एस एस सी २००२ च्या गटात असणाऱ्या मित्रांनी केला आहे.मालाड मधील नागरिकांना जनतेला त्यांनी आवाहन केले , की विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करून आपण घरातच राहावे आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी व या राष्ट्रीय
आपत्तीत सर्वांनी मिळून मुकाबला करण्यासाठी
शासनाला सहकार्य करावे.