Home महत्वाची बातमी खाजगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची शासनाकडून मिळणारी फिस गेल्या चार...

खाजगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची शासनाकडून मिळणारी फिस गेल्या चार वर्षापासुन विनाकारण आडवीणाय्रा अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी

117

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

गोरगरीब मुलांना ही उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारने नामांकित शाळेत गोरगरिबांच्या आर्थिक दुर्बल घटकातील ( आर टी इ अंतर्गत) मुलांसाठी प्रवेश कोटा निश्चित करून या जागेवर शासनाकडून मुलांना प्रवेश दिला जातो व या मुलांची सरकारकडून फी भरली जाते ,ज्या शाळेत एक लाख फी असते अशा महागड्या नामांकित शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेऊ शकत नाही,त्यामुळे अशा नामांकित शाळेत गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.यामुळे शिक्षणातील विषमता दूर होऊन गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावला जाणार आहे.खाजगी नामांकित शाळेनेही सरकारने दिलेल्या नियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देऊन शासनाच्या नियमाचे पालन केले असले तरीही,शासनाकडून मात्र गेल्या चार वर्षापासून या मुलांची फी शाळेकडे भरली गेली नसून याबाबत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
गेल्या चार वर्षापासून शासनाकडून खाजगी शाळेकडे या गोरगरीब मुलांच्या फीचे पैसे देण्यात आले नसल्यामुळे खाजगी शाळांनी यावर्षी गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करण्याची शक्यता आहे.शासनाकडून याबाबत स्पष्ट निर्देश असतानाही या मुलांची फी शाळेकडे वर्ग करण्यासाठी अधिकाऱ्याकडून का अडवणूक करण्यात येत आहे याची चौकशी होण्याची गरज आहे.शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे अनेक किस्से चर्चेत असून केवळ खाजगी शाळेकडून पैसे वसूल करण्यासाठी शाळेकडे फी वर्ग करण्यात येत नसल्याची चर्चा असून,सरकारने याबाबत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.खाजगी शाळेला कोणत्याही प्रकारचे अनुदान नसल्यामुळे या शाळा मुलांकडून मिळणाऱ्या फी वरच चालतात या मधूनच शिक्षकांचा पगार व शाळेचा सर्व खर्च संस्था चालक करतात.पण शाळेला शासनाकडून गेल्या चार वर्षापासून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांची शाळेकडे सरकार करून फी जमा करण्यात आली नसल्यामुळे शाळेचे व्यवस्थापन कोलमडले असून याचा शैक्षणिक गुणवत्तेवर आणि मुलाच्या शैक्षणिक सुविधा यावर परिणाम होणार आहे.
जे की सर्व नियमबाह्य आहे.
‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था झाली आहे. तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी नांदेड यांनी चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी आहे.
खाजगी शाळेची गेल्या चार वर्षापासून ची फी जमा न करता या शाळेची आर्थिक कोंडी करून चिरीमिरी उकळण्याचा हा प्रकार असून हे भ्रष्ट अधिकारी कोण आहेत याची तात्काळ चौकशी करून भ्रष्ट अशा (बै-ईमान) अधिकाऱ्यां विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी खाजगी शाळा चालकां कडून होत आहे.