Home मराठवाडा तिरंगा फोटोचे पूजन करत मोदींच्या आवाहनास सिलमवार परिवाराचा प्रतिसाद…!

तिरंगा फोटोचे पूजन करत मोदींच्या आवाहनास सिलमवार परिवाराचा प्रतिसाद…!

32
0

नांदेड / किनवट – आज कोरोना या महामारीला हारविण्यासाठी अखंड भारत भर एकाचवेळी रात्री 9 वाजता दिवे ( टॉर्च , बॅटरी , मोबाईल ) लावण्याकरिता मोदीजी ने केलेल्या आवाहनाला देशातील जनतेकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देण्यात आला.

कारण या महामारी सारख्या आजारातून पेशन्टला उभारी येण्यासाठी व ह्या कोरोना पसरू नये यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांसाठी व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी डॉक्टर , नर्स , आरोग्य कर्मचारी , स्वच्छता कामगार , वाहन चालक , महसूल विभाग , विद्युत विभाग , नगर पालिका , महानगरपालिका , जिल्हा परिषद , कृषि या सारख्या प्रशासकीय विभागामध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीसाठी तसेच या लढ्यामध्ये साथ देणाऱ्या विविध भागात अडकून पडलेल्या गरजू लोकानां अन्नाची सोय करणाऱ्या सेवाभावी संस्था,विविध लोकप्रतिनिधी या सर्वाचे मनोबल उंचावण्यासाठी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी च्या मोहिमेला काही जणांनी विरोध दर्शवित टिकेची झोड उठविल्यानंतरही संबंध देशाच्या कानाकोपर्यातुन खूप मोठ्या प्रमाणात एकाचवेळी एकतेचे दिवे लावून अखंड एकतेची साथ संपूर्ण जगाला दाखवून दिली. तरी आपण सर्व या परिस्थितीतुन नक्की बाहेर येवू , काळजी घ्या, सुरक्षित रहा.
Stay Home & Stay Safe इतिहास याद रखेगा
*इस दिन को*
*जब पूरा संसार*
*डगमगा रहा था*
*तब*
*हिंदुस्तान जगमगा रहा था..