Home मराठवाडा महापुरुषांच्या फोटोचे पूजन करत मोदींच्या आवाहनास प्रतिसाद

महापुरुषांच्या फोटोचे पूजन करत मोदींच्या आवाहनास प्रतिसाद

66
0

सखाराम बोबडे यांचा आदर्श उपक्रम…!

परभणी / गंगाखेड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दिवे लावण्याच्या अभियानात सहभाग म्हणून महापुरुषांच्या प्रतिमेचे दिवे लावून पूजन करत करण्यात आले.धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सहकुटुंब या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच तारखेला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे दिवे लावून आपला देश एक आहे आणि आम्ही देशाचा सोबत आहोत हा संदेश सर्वांना देण्यासाठी आपल्या घरातील लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या कुटुंबासह सहभाग नोंदवला. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी केलेले आवाहन आणि आदेशाची अंमलबजावणी आपण सर्वांनी करून कोरोणासारख्या राष्ट्रीय महामारी पासून आपल्या स्वतःला व देशाला सुरक्षित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यावेळी अशिष बोबडे, अविष्कार बोबडे उपस्थित होते.