Home महाराष्ट्र संचार बंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कार्यवाही ,

संचार बंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कार्यवाही ,

53
0

जीवन महाजन

नंदुरबार ,

सद्या देशभरात कोरोनाचे थैमान असल्याने संपूर्ण देशभरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे तरीही देखील बंदीचा काळात विनाकरण फिरणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे .नंदुरबार शहरात किराणा आणि औषधी अश्या महत्वाच्या गोष्टींचे नाव सांगून फिरणाऱ्या ची संख्या मोठी आहे हि बाब लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने अश्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यास सुरवात केली या व्यक्तींच्या मोटर सायकली जप्त करण्यात येत असून त्या त्यांना एक महिन्या नंतर परत देण्यात येतील तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे हि कारवाई नंदुरबार शहर पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरिकांनी कामा शिवाय बाहेर पडू नये असे आह्वान केलं आहे