Home विदर्भ वाडेगाव येथिल 17 जणांचे अहवाल निगेटीव्ह

वाडेगाव येथिल 17 जणांचे अहवाल निगेटीव्ह

31
0

देवानंद खिरकर

वाडेगाव येथे दिल्ली येथुन आलेल्या 18 पैकी 17 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत.तर एकाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.दरम्या लन आज पुन्हा दिल्ली येथे निजामुद्दीन येथिल तब्लिग जमातच्या मरकज येथे सहभागी झालेल्या अकोला जिल्ह्याशी सबंधीत 14 जणांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली.त्यांचा शोध प्रशासनाने लगेचच सुरु केल.त्यातील पाच व्यक्ती हे जिल्ह्यात नाहीत.पुणे,अमरावती,वाशिम येथे प्रत्येकी एक व्यक्ती असुन दोघे राजस्थानचे आहेत.उर्वरीत नऊ जणांशी प्रशासनाचा संपर्क झाला असुन त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया सुरु आहे.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.अद्याप तब्लिग जमात च्या कार्यक्रमाशी सबंधीत आजची 14 जणांची यादी मिळुन 29 जणांची यादी जिल्ह्यात प्राप्त झाली आहे.त्यातील नऊ जण भरती आहेत.तर उर्वरीत नऊ जणांशी संपर्क होऊन भरती करण्यात येत आहेत.उर्वरीत 11 जण हे जिल्ह्या बाहेर आहेत.यातील ज्यांचे ज्यांचे तपासणी अहवाल हे निगेटीव्ह आले,त्यांना सगळ्यांना पुढचे 14 दिवसांसाठी संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.अशी माहीती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

Unlimited Reseller Hosting