Home मराठवाडा बॉटल मध्ये पेट्रोल विक्री करीत असल्याचा व्हिडीओ व्हाट्सअप्प वर व्हायरल झमझम पट्रोल...

बॉटल मध्ये पेट्रोल विक्री करीत असल्याचा व्हिडीओ व्हाट्सअप्प वर व्हायरल झमझम पट्रोल पंप सील ,

29
0

अँड शेख ताज अहेमद ,

गेवराई जिल्हा बीड

सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन करण्यात आलेले असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वाहने वगळता अन्य खासगी वाहनांना पेट्रोल ,डिझेल विक्रीस बंदी घालण्यात आलेली असतांना गेवराई येथील झमझम पेट्रोल वर बॉटल मध्ये खासगी व्यक्तींना विक्री केला जात असल्याचा व्हिडीओ उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच तहसीलदार व पोलिसांनी पेट्रोल पंप गाठून पंचनामा करीत पेट्रोल पंप सील केल्याने पंप चालकांचे धाबे दणाणले आहे
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील झमझम पेट्रोल पंप चालक अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती आहे किंवा नाही याची खात्री न करता जिल्हादंडाधिकारी आदेशाचे उल्लंघन करीत बॉटल मध्ये पेट्रोल विक्री करीत असल्याचा व्हिडीओ व्हाट्सअप्प वर उपविभागीय अधिकारी श्री करपे यांना प्राप्त होताच त्यांच्या आदेशाने तहसीलदार धोंडीराम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश जोगदंड कर्मचर्यासह झमझम पेट्रोल पंप वर पोहचले आणि पंचनामा करून पेट्रोल पंप सील केल्याने पंप चालकांमध्ये खळबळ माजली आहे सदर पंप मालकविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे

Unlimited Reseller Hosting