Home विदर्भ हिवरखेड परिसरातील हिंगणी शेतशिवारात दोन बिबट्यांनी मांडले ठाण

हिवरखेड परिसरातील हिंगणी शेतशिवारात दोन बिबट्यांनी मांडले ठाण

435

परिसरात पसरली दहशत ,

देवानद खिरकर

हिवरखेड: तालुक्याच्या उत्तरेस हिंगणी बु. शेत शिवारात बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांना दर्शन दिल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
हिंगणी बु. येथील राधेश्याम कोरडे यांच्या शेतात संध्याकाळी सदर बिबट्या काळवीट शिकार करताना दिसला. राधेश्याम कोरडे यांच्या सोबत त्यांचा छोटा मुलगा होता म्हणून सोबतच्या परिवारातील सदस्यांनी आरडाओरडा केला असता बिबट्या घाबरून मंगेश कोरडे यांच्या केळीच्या पिकात जाऊन दडून बसला. हाच बिबट्या दोन दिवसासाठी लक्ष्मण नराजे यांच्या शेतात मुक्त संचार करताना दिसला होता. तर दुसरीकडे एक बिबट्या नसून दोन बिबटे एक सोबत ज्ञानदेव राजाराम खडसे यांच्या आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पंधरा दिवसांपासून मुक्काम ठोकत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्ञानदेव खडसे, रघुनाथ कोरडे, सुभाष कोरडे, राधेशाम कोरडे, प्रशांत साबळे, मुगुटराव देशमुख, फुकट पाहुणे बॉ, इत्यादी शेतकरी आणि नागरिकांनी दोन्ही बिबट्यांना अनेकदा स्वतः डोळ्यांनी प्रत्यक्ष पहिल्याची माहिती शेतकरी ज्ञानदेव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
सदर बाब हिवरखेड पोलिस स्टेशनला आणि वनविभागाला कळविली असता अजूनर्यंत फॉरेस्ट अधिकारी आलेले नाहीत. गावात शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जाऊ शकत नाही आहेत. यामुळे शेतीचे नुकसान होणार असल्यामुळे सगळीकडे एकाच हलबळ उडाली आहे.
आधीच कोरोनामूळे गावात भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यावर एकावर एक संकट येत असून आता बिबट्यांचा मुक्त संचार शेतकऱ्याच्या मनात भीती घालून बसलाय. तरी फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी ही मागणी आता शेतकरी करत आहेत अन्यथा गावकरी या मधून स्वतःच काहीतरी कठोर मार्ग काढतील असा विनंती वजा इशारा देण्यावाचून हिंगणी बू. येथील शेतकऱ्यांना पर्याय नाही अशी हतबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.