Home विदर्भ यवतमाळ संचारबंदीत १२ दिवसात जिल्हा वाहतुक शाखेने २८५३ केसेस करुन ८ लाख...

यवतमाळ संचारबंदीत १२ दिवसात जिल्हा वाहतुक शाखेने २८५३ केसेस करुन ८ लाख ३६ हजार ८०० रुपयाचा दंड केला वसुल

122

रवि माळवी

यवतमाळ , दि. ०४ :- कोरोना विषाणुचे संसर्गामुळे उद्भवणा:या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्या करीता कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागु असून संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशा परिस्थितील नागरीकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन करण्यात आले असतांना काही नागरीक शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन दुचाकी, चारचाकी वाहनाने निष्कारन घराबाहेर पडतात. याकरीता पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी जिल्हा पोलीस दलास विवध मोहीम राबवीण्याचे आदेश दिले होते. याच धर्तीवर जिल्हा वाहतुक शाखा यवतमाळ कडून निष्कारन घराबाहेर पडणा:या व वहनाचे कागदपत्रे सोबत न बाळगणा:या व नियमांच उल्लघन करणा:या वाहन धारकांविरुध्द मोहीम सुरु केली होती. दिनांक २३.३.२०२० ते दिनांक ३.४.२०२० पावेतो एकुण १२ दिवसांचे कालावधीत जिल्हा वाहतुक शाखा, यवतमाळ कडून राबवीलेल्या मोहीमेमध्ये एकुण २ हजार ८५३ वाहनांविरुध्द कार्यवाही करुन एकुण ८ लाख ३६ हजर ८०० रुपयाचा दंड वसुल केला आहे. तसेच आजपावेतो एकुण २९० वाहनांना डिटेन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नूरुल हसन, श्रीमती माधुरी बावीस्कर, उपविपोअ, यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखा, यतमाळ येथील अधिकारी, कर्मचारी यांनी पार पाडली.