Home विदर्भ धामणगांव तालुक्याती विटाळा गांवात अवैद्य धंद्याला अभय कुणाचे?

धामणगांव तालुक्याती विटाळा गांवात अवैद्य धंद्याला अभय कुणाचे?

74
0

बाबाराव इंगोले – झाडगांव

अमरावती / धामणगांव रेल्वे – प्राप्त माहीती नुसार धामणगांव रेल्वे तालुक्यातील विटाळा गांवात अनेक दिवसा पासुन अवैद्य धंदे जोमात सुरु आहे.यापुर्वी महिला बचत गटाच्या वतीने गांवातील दारुबंदी करीता मोठ्या प्रमाणात मोहिम उघडण्यात आली होती.परंतू पुन्हा गांवात गावठी व देशी दारु राजरोसपणे चालू झाली.त्यामुळे गांवातील नागरिकांत निर्माण होत आहे, अखेर ह्या अवैद्य धंद़्याना अभय कुणाचे?असा प्रश्न जनमाणसांत निर्माण होत आहे.
विटाळा गावा जवळच ओकनाथ शिवारात अनेक बिअर बार व दारुचे दुकाने आहे.हे गांव दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या सिमे जवळ असल्याने या गावात गावठी व देशी विदेशी दारुचे धंद़्ये जोमात खुलेआम ज्यादा भावाने विक्री करीत आहे.त्यामुळे परीसरात नेहमीच पोलीस पेट़्रोलींग करीत असतांना वेळ प्रसंगी पोलीस चौकी असून सुद्या गावात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे कसे चालतात यावर नागरीकांचा प्रश्न निर्माण होत आहे.सद्यस्थितीत राज्यात व देशात संपुर्ण संचारबंदी असून कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसे दिवस वाढत आहे,तसेच शासनाच्या वतीने युद्ध पातळीवर सर्वपरी प्रयत्न चालू आहे.परंतू अशा परीस्थितीत गावा जवळ असणाऱ्या सर्व बिअर बार व दारुचे दुकाने बंद असल्याने व वर्धा जिल्हा दारु बंदी असल्याने तेथील लोक व आजूबाजूच्या गावातील सुद्धा लोक विटाळा गावात दारु पिण्या करीता येतात,त्यामुळे गर्दी होत आहे.गावातील चौकात कुठल्याही प्रकारचा जमाव एकञ येवू नये या करीता सरपंच,पोलीस पाटील तसेच कोरोना नियंञण व स्वच्छता समिती गठीत करण्यात आली असून त्या प्रमाणे गांव स्तरावर प्रयत्न चालू आहे.
गावातील अवैद्य दारु विक्री करणाऱ्यांना ग्राम पंचायतचे सरपंच व पोलीस पाटील यांनी वारवांर सुचना देवूनही गावात अवैद्य दारु विक्री मोठ्या प्रमाणात चालूच आहे.या बाबतची सबंधीत विभागाला लेखी माहीती राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाला दिली असता अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.विशेष म्हणजे विटाळा येथे पोलीस चौकी असतांना सुद्धा गावात मोठ्या प्रमाणात गावठी व देशी विदेशी दारु येते तरी कशी व दारुचे अवैद्य धंदे सर्रास कुणाच्या आशिर्वादाने चालू आहे हे न उलगडनारे कोडे आहे. एवढी राष्टीय आपत्ती असतांना सुद्धा बाहेरील लोक गावात दारु पिण्या करीता गर्दी करीत असल्याने गावातील जबाबदार व्यक्तीनी अवैद्य व्यवसायाला लगाम लावण्या करीता व्यावसायिकांच्या नावासहीत लेखी तक्रार देवुन सुद्धा संबंधीत विभाग कोणतीच कारवाई अवैद्य धंदे करणाऱ्यावर करीत नसल्याने विटाळा गावात अवैद्य दारुचा व्यवसाय करणाऱ्याला अभय कुणाचे असा प्रश्न जनमानसात निर्माण होत आहे.