
यवतमाळ – कोरोना वायरसमुळे मागील 12 दिवसापासून संपूर्ण यवतमाळ शहर लॉकडाऊन करण्यात आले असून कोरोना वायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून चौका चौकावर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधव तैनात असून या पोलीस बांधवांना यवतमाळ
ब्लड डोनर्स असोसिएशनच्या वतीने 5 हजारह पेक्षा जास्त विटामिन सी, लिम सी 500 एम. जी. गोळ्यांचे वाटप चौका चौकात सेवेवर असलेल्या पोलीस बांधवांना तसेच यवतमाळ शहरातील ट्राफिकची व्यवस्था सुरळीतपणे पाळ पाडणार्या तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचार्यांना करण्यात आले. शहर पोलीस स्टेशन, यवतमाळ जिल्हा वाहतुक शाखा, अवधुतवाडी पोलीस स्टेशन व कमांडो बांधवांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अर्गुलवार, सचिव निलेश ताठीपामुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, कोषाध्यक्ष राजू मामीडवार, प्रसिद्धी प्रमुख विजय कुमार बुंदेला, अविनाश जिड्डेवार, काशिनाथ ब्राम्हणे यांनी अविरतपणे परिश्रम घेऊन वितरीत केले. पोलीस बांधवांना यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशन तर्फेविटामीन सी गोळ्यांचे वाटप करण्यात आले त्याबाबत पोलीस बांधवांनी समाधान व्यक्त केले.