Home उत्तर महाराष्ट्र शिवरायांच्या स्मृतिदिनी आगळी – वेगळ अभिवादन.

शिवरायांच्या स्मृतिदिनी आगळी – वेगळ अभिवादन.

67
0

गिरणारेतील किरण खुर्दळ हिने रेखाटली रायगडावरील शिवस्मृती समाधी….

नाशिक , ( प्रतिनिधी ) – चित्रकलेचा अंगभूत व्यासंग असलेल्या गिरणारेतील किरण राम खुर्दळ हिने छत्रपती शिवरायांच्या स्मृतिदिनी (दि.३ एप्रिल) राज्यांना भावपूर्ण अभिवादन देण्यासाठी दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या स्मृतिसमाधीचे चित्र रेखाटले.व त्यासोबत शब्द सुमानांनी शिवरायांना
आदरांजली वाहिली.
चैत्र शुद्ध पौर्णिमा,शके १६०२ अर्थात ३ एप्रिल १६८० छत्रपती शिवरायांचा स्मृतिदिन,छत्रपती राजे किल्ले रायगडावर अवघ्या स्वराज्याला पोरके करून सोडून गेले,हा दिवस म्हणजे अवघ्या रयतेसाठी दुःखाचा दिवस,शिवरायांनी अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात राजमाता जिजाऊच्या संस्काराने मावळ्यांची सोबत करून अथक शौर्य पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.अवघे ३५ वर्षे राजे स्वराज्यासाठी अविरतपणे राबत होते,अश्या प्रजाहितरक्षक राज्याचा स्मृतिदिन अवघ्या विश्वास शिवभक्त साश्रु नयनाने दीप लावून ३ एप्रिल रोजी साजरा करतात.छत्रपती शिवरायांना आदरांजली म्हणून राज्यांच्या स्मृतिदिनी किरण खुर्दळ(वय १६) हिने किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या स्मृतिसमाधीचे पेंशील स्केच चित्र रेखाटले.
दरम्यान सध्या कोरोनामुळ लोकडाऊन असतांना कुटुंबातील अनेकजण घरात बसून आहे,मात्र किरण खुर्दळ ही मुलगी चित्र रेखाटण्याच्या छंदात व्यस्त आहे,तिने अनेक चित्र रेखाटले आहे.तिच्या “पक्षांचे झाड”या चित्रास वनखाते व नेचर क्लबचा निसर्गचित्रकार म्हणून नाशिकला गौरवही झाला होता,चित्रकलेसोबत किरणने घरात कागदाच्या लगद्यापासून काही मुर्त्या,छोटे पुतळे,तयार केले असून घरातील पुठ्ठे, पत्रिकांच्या माध्यमातून तिने कपाट,शोकेश,मंदिरे साकारली आहे.दरम्यान युवाचित्रकार किरणचे वडील राम खुर्दळ हे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक असून ते अनेक वर्षे गडकिल्ल्यांचे संवर्धन करतात,त्यांच्या मार्गदर्शनाने सातत्याने शिवरायांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम होत आहे,कित्येक बाल शाहीर,व्याख्याते त्यांनी घडवले आहेत.
आपला:-
श्री.राम खुर्दळ

9423055801