Home बुलडाणा बुलढाण्यात सॅनिटायझर ( क्लिंझर) व हॅन्ड वॉश निर्मिती करणाऱ्या एस के लॉडर...

बुलढाण्यात सॅनिटायझर ( क्लिंझर) व हॅन्ड वॉश निर्मिती करणाऱ्या एस के लॉडर कॉस्मेटिक इंडस्ट्रीचा शुभारंभ

44
0

अमीन शाह

बुलढाणा : दि.२ एप्रिल रोजी बुलढाणा येथे राम नवमीच्या पावन मुहूर्तावर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हॅन्ड सॅनिटायझर(क्लिंझर) व हॅन्ड वॉश निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे साहेब,सहाय्यक आयुक्त गजानन घिरके अन्न व औषध निरीक्षक प्रशांत ब्राम्हणकर यांच्या कार्यतत्परतेने बुलढाणा जिल्हा वासीयांसाठी तात्काळ सॅनिटायझर (क्लिंझर) उपलब्ध करण्यासाठी व त्या निर्मितीसाठी लागणारा परवाना एस के लॉडर कॉस्मेटिक इंडस्ट्रीला तात्काळ मंजूर करून दिल्याने या इंडस्ट्रीद्वारे बुलढाणा येथे दर दिवशी चाळीस हजार सॅनिटायझर(क्लिंझर) व चाळीस हजार हॅन्ड वॉशची निर्मिती केल्या जाणार असून सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सॅनिटायझर तात्काळ उपलब्ध होने शक्य नव्हते त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता परंतु आता बुलढाणा जिल्ह्ययासह विदर्भात कोरोनाशी चार हात करण्यासाठी एस के लॉडर कॉसमॅटिक इंडस्ट्री ही महत्वाची ठरणार आहे.या शुभारंभ प्रसंगी प्रशांत ढोरे पाटील यांनी बोलतांना सीमेवरील जवानांप्रमाणे आरोग्य क्षेत्रातील लोकांनी कोरोनाला तोंड दयावं व
आरोग्य क्षेत्रातील लोकांनी लॉक डाऊनच्या नावाखाली कर्तव्या पासून पलायन करू नये असे सांगितले,
जगभरात सर्वत्र कोरोना या महाभयंकर व्हायरसने आक्रमक व गतिशील रूप धारण करून जोरदार आक्रमण केलेले आहे
चायना पासून कोरोनाच्या या महामारीची सुरवात झाली व बघता बघता दोनशे देशाच्या वर व आता आपल्या पर्यंत हा व्हायरस येऊन पोहचला देखील आहे,
राज्य शासन व केंद्र शासनाकडून वारंवार सांगून देखील पाहिजे तसा परिणाम लोकांमध्ये होतांना दिसत नाही आहे,
नागरीकांमध्ये या व्हायरसची कमालीची दहशत असतांना देखील पाहिजे तेवढी जागरूकता,कोरोना व्हायरस प्रती असलेली भीती कुठेतरी दुर्लक्षित केल्या जात असल्याचे सर्वत्र दिसत आहे
नागरिकांना काही वेळासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जी सूट दिल्या जात आहे त्याचा सामान्य नागरिकांकडून पुरेपूर गैरवापर होतांना दिसत आहे व ज्यांनी खऱ्या अर्थांने सीमेवरील जवानांप्रमाणे कोरोनारुपी शत्रूशी चार हात करण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी या कोरोनाच्या युद्धभूमीवर रणांगणात उतरायला हवं तेच उतरतांना दिसत नाहीत व आरोग्य क्षेत्रातील काही लोक जीवावर उदार होत दिवस रात्र घरादाराचा बायका मुलांचा विचार न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत तर काही याच क्षेत्रातील लोक आपल्या जीवाची काळजी करत स्वतःच लॉक डाउनच पांघरून घेऊन बिळात लपून बसलेले आहेत,त्यांना कुठेतरी आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला दिसत आहे,स्वतः आपण व आपलं कुटुंबच सर्वस्व मानून असे जगणे कितपत योग्य आहे ज्या लोकांनी घरात बसून कोरोनाला रोखायच आहे ते रस्त्यावर फिरत आहेत व ज्यांनी या युद्धात हातात तलवार,बंदूक रुपी स्टेथो,इंजेक्शन,औषधी हे हत्यार घेऊन खऱ्या अर्थाने रणांगणात उतरायला हवं ते लॉक डाउनच गोंडस पांगरून घेऊन बसलेले आहेत,
बहुतांश डॉक्टर,फार्मासिस्ट,नर्स,कंपाउंडर,लॅब टेक्निशियन,पोलीस,पत्रकार बांधव,जागरूक लोकप्रतिनिधी रात्रंदिवस कोरोनाशी चार हात करत आहेत त्यांना शालूट व जे लॉक डाउनच पांगरून घेऊन बिळात लपून बसलेले असतील त्यांनी बाहेर निघणे खूप गरजेच आहे
तरुण वयात देशाच्या संरक्षनासाठी सीमेवर छाताडावर गोळ्या झेलणारे जवान बघा व आरोग्य क्षेत्रातील लोकांना देवाचा दर्जा देऊनही व भरभक्कम पैसा देऊनही जनसेवेच्या कर्तव्यापासून काही लोक दूर पळत असल्याचे दिसत आहे तरी त्यांनी लॉक डाऊनच्या गोंडस नावाखाली आपल्या कर्तव्यापासून पलायन करू नये,आरोग्य क्षेत्रातील बरेच जण म्हणतात की आवश्यक असणारे एन 95 मास्क,सॅनिटायझर, ग्लोव्हज, इतर साहित्य उपलब्ध नसल्याने रुघ्न सेवा देऊ शकत नाही पण त्यांनी शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे स्वराज्याच्या रक्षणासाठी मिळेल त्या लाठ्या काठ्यांचे, दगड धोंड्याचे हऱ्यार करून स्वराज्य रक्षण केले होते त्या प्रमाणे आरोग्य क्षेत्रातील लोकांनी पळपुटी भूमिका न घेता ही कोरोना रुपी शत्रूवर कशी मात करता येईल हे बघावं अस परखड मत सामाजिक कार्यकर्ते तथा बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रागिस्ट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केले,याप्रसंगी विनोद जवरे पाटील,संजय इंडोले, राजेश जाधव,आशिष जाधव,गणेश बंगळे, राजेंद्र तळेकर,गणेश धुंदळे, संकल्प इंडोले, प्रतीक इंडोले, अशोक खरे,आण्णा गवई आदींची उपस्थिती होती.