Home जळगाव मध्य रेल्वेने गेल्या १० दिवसांत ५५० रॅकमध्ये २८,००० हून अधिक वॅगन लोड...

मध्य रेल्वेने गेल्या १० दिवसांत ५५० रॅकमध्ये २८,००० हून अधिक वॅगन लोड केल्या आहेत

74
0

लियाकत शाह

कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे जीवनावश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी फक्त मालवाहतूक चालवित आहे. देशभरातील पुरवठ्यासाठी २४/७ सतत कार्यरत असणा-या अनेक गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांतील रेल्वे कर्मचा्यांनी ५५६ रॅकमध्ये आवश्यक वस्तूंच्या २८,५५५ वॅगन लोड करणे शक्य केले आहे. एकूण २८,५५५ भारित वॅगनमध्ये, १६,९६४ वॅगन कोळसा, २,४४३ वॅगन पेट्रोलियम पदार्थ, ७,०५९ कंटेनर, ४७५ वॅगन खत, ४२ वॅगन अन्नधान्य, ८४ वॅगन साखर, ८४ वॅगन कांदा, ६७६ वॅगन विविध वस्तूंचा आणि ७२८ वॅगन्स इतर वस्तूंचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा अनेक ठिकाणी या वॅगन्स दिनांक २१.३.२०२० ते ३१.३.२०२० पर्यंत लोड केल्या गेल्या. अत्यंत वरिष्ठ स्तरावरील अधिका-यांमार्फत फ्रेट वाहतूकीवर बारीक नजर ठेवली जात आहे. मध्य रेल्वेला या कठीण काळात आपल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे भान आहे आणि सर्व भागधारकांना या प्रयत्नात पूर्णपणे सहकार्य करण्याची विनंती करण्यात येत आहे. सदर प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.