Home महत्वाची बातमी संचारबंदी व लॉकडाऊन आदेशाचा भंग दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संचारबंदी व लॉकडाऊन आदेशाचा भंग दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

11
0

रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-कोरोना सारख्या आजाराचा व्हायरल रोखण्यासाठी सरकारने कलम 144 लागू करून संचारबंदी व लॉकडाऊन आदेश जारी केले असे असताना दारूच्या नशेत इंडिका घेऊन रस्त्यावर धिंगाणा केला त्यामुळे अंढेरा ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 28 मार्च रोजी सायंकाळी घडली.
सविस्तर असे की,दिनांक 25 मार्च 2020 पासून सरकारने कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी कलम 144 जारी करून संचारबंदी व लॉकडाऊन करण्याचे सक्तीचे आदेश काढले मात्र ग्रामीण भागात नागरिक लॉकडाऊन आदेशाला केराची टोपली दाखवत राजरोसपणे घराबाहेर येऊन मुख्य रस्त्यावर फिरत आहे त्यामधे बाहेर जिल्ह्यातून गावात परतलेले गावकऱ्यांमध्ये फिरत आहे.काही जण तर दारूच्या नशेत रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालवून धिंगाणा घालतात असाच एक प्रकार अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत फाट्यावर घडला यामध्ये दुसरबीड येथील रहिवासी असलेले महेबूब खा शब्बीर खा
वय 33 वर्ष व शे.हुसेन शे.कासम वय 34 हे दारूच्या नशेत इंडिकाने रस्त्यावर येऊन धिंगाणा घालतांना पोलिसांना आढळून आले.त्यांना हटकले असता त्यांनी पोलिसांसमोर हुज्जत घातली अशा कारणावरून पो.का.समाधान झिने यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपविरुद्ध कलम 188भादवी प्रमाने गुन्हा दाखल केला आहे.

Unlimited Reseller Hosting