Home सोलापुर कर्नाटक महाराष्ट्र सीमा बंद, कडक पोलिस बंदोबस्त.

कर्नाटक महाराष्ट्र सीमा बंद, कडक पोलिस बंदोबस्त.

32
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी व आळंद तालुक्यातील हिरोळी या कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर कोरोना विषाणूच्या पाश्वभूमिवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन सीमा बंद ठेवण्यात आले आहे. काही संशय आल्यास वाहनातील प्रवाशाची जागेवरच तपासणी करण्यासाठी वैद्यकिय पथक तैनात करण्यात आले आहे.
देशात कोरोनो आजाराने थैमान घातला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणत्याही तपासणी शिवाय शहरातील नागरिकांना गावात प्रवेश केल्यामुळे डोके दु:खी वाढला आहे. त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर तपासणी चालु आहे. कर्नाटकातील वाहने महाराष्ट्रत सोडले जात नाही तर महाराष्ट्रतील वाहने कर्नाटकात सोडले जात नाही. शासनाने सर्व खबरदारी घेत आहेत. सध्या शहरातून विशेषता मुंबई व पुण्यातील नागरिक गावी परत येत आहेत. येणा-या सर्व नागरिकांचे तपासणी शुरू आहे. वाहनाची कसुन चौकशी केली जात आहे. काही पुण्यातील लोक पहाटेच्या वेळी दोन चाकी वाहनातुन पहाटे येत आहेत
अशा लोकाचे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. ग्राम पातळीवर दररोज किती लोक शहरातून आले त्या सर्वांची नोंद ठेवणे व तपासणी करणे गरजेची आहे.

वागदरी येथे ग्राम सुरक्षा रक्षकामार्फत गावात येणा-यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात खबारदारीचा उपाय म्हणुन १४४ कलम लागु आहे. ग्राम सुरक्षा कर्मचारी पोलिसांना मदत करून नागरिक बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेत आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन कोणीही बाहेर कामा शिवाय फिरू नये असे आवाहन करण्यात येत आहे. तरी पण काही लोक न जुमानता फिरताना दिसुन येत आहे. त्यामुळे पोलिसाचे डोके दुखीत वाढ झाले आहे.

Unlimited Reseller Hosting