Home मराठवाडा आरोग्य कर्मचारी आणि पोलिस अन् पत्रकारांना डबल पगार द्या – सखाराम बोबडे...

आरोग्य कर्मचारी आणि पोलिस अन् पत्रकारांना डबल पगार द्या – सखाराम बोबडे पडेगावकर

301
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

गंगाखेड – कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीच्या काळातही आपलं काम हे राष्ट्रीय कर्तव्य समजून दिवस – रात्र राबणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलिस अन् पत्रकारांना डबल पगार देण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार , तथा धनगर साम्राज्य सेनाचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका ईमेल द्वारे केली आहे.

कोरोणा या महामारीच्या भीतीने बहुतांश लोक घरातच बसून आहेत. पण पोलिस आरोग्य कर्मचारी आणि पत्रकार मात्र आपापल्या कामात व्यस्त आहेत. नव्हे तर नियमित कामा पेक्षाही डबल कामाचा भार त्यांच्यावर पडलेला आहे. आपलं काम हे राष्ट्रीय कर्तव्य समजून ही मंडळी कार्य करत आहेत. लॉकडाऊन च्या काळात दिवस-रात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स ,पोलीस आणि पत्रकारीता , वेब न्यूज पोर्टल , न्यूज चॅनल , वृत्तपञ क्षेत्रातील मानधन अथवा फक्त जाहिरातीच्या कमिशनवर , वर्तपत्र विक्रीच्या कमिशनवर काम करणाऱ्या सर्व कामगारांना या काळात डबल मानधन देण्यात यावे अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.