Home मुंबई कोरोनाच्या लढाईत शिर्डीसाई कडून ५१ कोटी तर क्रिकेटचा देवही धावला मदतिला…!

कोरोनाच्या लढाईत शिर्डीसाई कडून ५१ कोटी तर क्रिकेटचा देवही धावला मदतिला…!

69
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विदर्भात ‘कोरोना’चे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं दिसत आहे. कारण सांगलीत आज तब्बल १२ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या (Help To Fight Corona) महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल १५६ वर जाऊन पोहोचला आहे.

या कठीण काळात जेव्हा देशातील बहूतेक नागरिक घरी बसले आहेत, तेव्हा देशावर आर्थिक भार वाढणे सहाजिक आहे. तसेच, इतर आरोग्य विषयक गोष्टींवरही सरकारला आर्थिक आधाराची गरज आहे. म्हणून कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक हात सरकारच्या मदतीला पुढे सरसावले आहेत.

कोणाकडून किती मदत?

शिर्डी साईबाबा ट्रस्ट – ५१ कोटी
CRPF अधिकारी – ३३.८१ कोटी
मुकेश अंबानी – ५ कोटी
अभिनेता प्रभास – ४ कोटी
बॉक्स ऑफिस इंडिया – ३ कोटी
अल्लू अर्जुन – १.२५ कोटी
अभिनेता पवनकल्याण – १ कोटी
सचिन तेंडुलकर – ५० लाख
शिवसेना खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
राष्ट्रवादी खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
नितीन गडकरी – एक महिन्याचा पगार
आनंद महिंद्रा – एक महिन्याचा पगार
भाजप खासदार – एक महिन्याचा पगार
भाजप आमदार – एक महिन्याचा पगार