Home महत्वाची बातमी पोलिसांच्या मारहाणीत एका निष्पाप वयक्तीचा मृत्यू , पोलिसांच्या काठीचा पहिला बळी ...

पोलिसांच्या मारहाणीत एका निष्पाप वयक्तीचा मृत्यू , पोलिसांच्या काठीचा पहिला बळी ,

59
0

पोलिसांनी माझ्या बापास मारून टाकले मुलाने केला आरोप ,

अमीन शाह

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे रुग्णवाहिकेमधून प्रवासी वाहतूक करत असल्याचा आरोप करत पोलिसांनी काठीने मारहाण केल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाने केला आहे. निलेश शिंदे असं या तरुणाचं नाव आहे. तरुणाने केलेल्या आरोपानुसार, पोलिसांनी वडील नरेश शिंदे यांच्या मांडीवर काठीने मारहाण केली होती. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे.
निलेश शिंदे याने केलेल्या आरोपानुसार, “आपण वडिलांसोबत ठाणे येथून रुग्णवाहिकेमधून एका रुग्णाला घेऊन नगरमधील श्रीगोंदा येथे जात होतो. जास्त लांबचे अंतर असल्याने वडीलदेखील सोबत होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे येताच वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका बाजूला थांबवायला सांगितली. प्रवासी घेऊन जात आहेस असं म्हणत उठाबशा काढायला लावल्या. तेव्हा आपण रुग्ण घेऊन जात असल्याचं सांगितलं. यानंतर वाहतूक पोलीस कर्मचारी मला आणि वडिलांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे घेऊन गेला. वडिलांनी आपण प्रवासी घेऊन जात नव्हतो असं सांगितलं. तितक्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने दोघांच्या मांडीवर काठीने मारले. वडील खाली कोसळले. यानंतर एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने प्रवासी घेऊन जात नाही तर आम्हाला पाच हजार रुपये द्या अशी मागणी केली. तडजोडअंती तीन हजार रुपये पोलिसांनी घेतले”.

रुग्णवाहिकेमधून तळेगावच्या पुढे जाताच अचानक वडील बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो, मात्र कोणी उपचार करण्यास तयार नव्हते. याच गोंधळात त्यांचा मृत्यू झाला असं निलेश शिंदेचं म्हणमं आहे. वडिलांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप निलेशने केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत. मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून नेमकं काय घडलं आहे हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणारआहे