Home मराठवाडा काम बंद झाल्या मूळे मजुरांवर उपासमारीची पाळी ???

काम बंद झाल्या मूळे मजुरांवर उपासमारीची पाळी ???

41
0

कामगार पायीच निघाले गावाकडे ,

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी

शेंद्रा एम आय डी सी मधील काम बंद झाल्याने मजुरांचे हाल होत असून,हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे मजुरांनी पायी गावाकडे निघण्यास प्रारंभ केल्याचे 30 मजूर बदनापूर शहरात आल्याने उघडकीस आले असून या मजुरांची खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था गणेश ठुबे यांनी केली तर काही दानशूर व्यक्तींनी देखील हातभार लावला

कोरोना रोगामुळे सर्व कामे बंद झाली असून मजुरांच्या हाताला काम राहिलेला नाही त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून शेंद्रा एम आय डी सी मध्ये काम करणारे माध्यप्रदेश मधील 30 मजूर पायी बदनापूर पर्यंत आले असता नगर पंचायत चे अभियंता गणेश ठुबे व शेख रशीद मौलाना यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्या मजुरांना थांबवून विचारपूस केली व महसुल,पोलीस प्रशासनास संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळाला नाही

अखेर नगर पंचायत अभियंता गणेश ठुबे यांनी माणुसकी दाखवीत त्या 30 मजुरांना रात्रभर राहण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या तसेच जेवणाची व्यवस्था करून दिली यामध्ये काही दानशूर व्यक्तींनी देखील हातभार लावला

Unlimited Reseller Hosting