Home विदर्भ हिवरखेड ला कोरोना मुक्त ठेवण्याचा निर्धार

हिवरखेड ला कोरोना मुक्त ठेवण्याचा निर्धार

188

*उपाययोजना आणि जागरुकते साठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समन्वय साधणारा ग्रुप तयार*

देवानद खिरकर

“कोरोना मुक्त हिवरखेड” ही संकल्पना लक्षात घेऊन हिवरखेड वासियांना कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास , आरोग्य, भोजन, औषधे, जीवनावश्यक वस्तू, दळणवळण, संचार, , इत्यादी माध्यमातून आवश्यक मदत वंचित आणि गरजू नागरिकांपर्यंत पुरविणे, आणि कोरोनाच्या बचाव संदर्भात जनजागृती करणे, शासनाकडून आणि वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी जारी होणारे अधिकृत दिशानिर्देश जनतेपर्यंत पोहोचविणे. सोशल मिडीयाद्वारे कोरोना संदर्भात अफवांबद्दलचे जनतेमधील गैरसमज दूर करणे, आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणांशी तात्काळ संपर्क व्यवस्था करणे, अशा प्रकारच्या अनेक सकारात्मक उद्देशातून अभिनव संकल्प म्हणून “कोरोना मुक्त हिवरखेड” हा व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आला असून यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, सरपंच, ठाणेदार, पोलीस बांधव, अनेक दानशूर व्यक्ती, समाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, अधिकारी वर्ग, प्रशासन, ग्रामपंचायत, तलाठी, बँकिंग क्षेत्रातील मान्यवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, रास्त भाव दुकानदार, डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर्स, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, शिक्षक, वकील, ड्रायव्हर, स्वयंसेवक, श्रम दाते, जीवनावश्यक सेवेशी संबंधित व्यक्ती, गॅस एजन्सी, होतकरू जागरूक युवक, इत्यादी विविध क्षेत्रातील सर्व समावेशक महत्वपूर्ण संबंधित अनेक व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. कोरोणाच्या प्रकोपा पासून वाचवण्यासाठी आणि वंचितांना आधार, आवश्यक तातडीची मदत देण्यासाठी या ग्रुपचा उपयोग करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय श्रेयवाद, धार्मिकता, जातीयवाद, इत्यादी गैर कामाच्या पोस्ट यांना स्थान नसणार आहे. शासनाकडून जारी होणारे नवे नवे निर्देश, लोकांना नवीन माहिती देणे, तसेच कोरोना संबंधित अपडेट्स पोहोचवणे या माध्यमातून सुरू झाले आहे.

ज्या व्यक्तींना गरजूंकरिता मदतीचा पुढे करायचा असेल आणि ज्या लोकांना काही मदत करायची इच्छा असेल त्यांनी
वस्तू किंवा सेवेच्या रूपात आणि इतर कोणत्याही स्वरूपात ते या ग्रुपशी संबंधित व्यक्तीजवळ आपल्या मदत करण्याची इच्छा व्यक्त करू शकतात

ग्रुप स्थापन होताच सकारात्मक सुरुवात झाली असून
भाजी बाजारात दररोज खरेदीसाठी गर्दी होत असून एकाच ठिकाणी अनेक लोक जमा होत आहेत याबाबत जागरूक नागरिकांनी हिवरखेडच्या सरपंचांशी चर्चा केली असता त्यांनी कोरोना संकट असेपर्यंत भाजी बाजार हा मेडिकल चौकातील प्राथमिक शाळा मध्ये आणि विकास मैदान येथे अशा दोन ठिकाणी नियमित भरविण्यात येईल. असा निर्णय घेत ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन तर्फे भाजी दुकानदारांसाठी आणि उभ्या असणाऱ्या ग्राहकांसाठी ठराविक अंतरावर आखणी करून देण्यात आली. आणि सर्व हिवरखेड वासियांना विनंती करण्यात आली की त्यांनी भाजी घेताना गर्दी न करता प्राथमिक शाळेत आणि विकास मैदान येथे ठराविक अंतरावर उभे राहूनच खरेदी करावी. तसेच भाजीपाला खरेदीसाठी वाहने आणू नये असेही सांगण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने 24 तास उघडे ठेवण्याची शासनाची परवानगी असली तरी अनेक टवाळखोर युवक आणि अतिउत्साही नागरिक खरेदीच्या नावावर विनाकारण गावात गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून स्वयंस्फूर्तीने दुकाने अकरा वाजेपर्यंतच उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि किराणा दुकानापुढे ठराविक अंतरावर ग्राहकांनी यासाठी आखणी करण्यात आली. इतरही अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. हे सर्व करताना सोशल डिस्टन्सवर विशेष भर देण्यात आला.
अशा प्रकारे सर्व हिवरखेड ला कोरोना मुक्त ठेवण्याचा निर्धार केला.