मराठवाडामहत्वाची बातमी

भाजीपाला अत्यावश्यक सुविधेत येत असल्याने भाजीपाल्यांचे दुकाने अंतरावर मार्कींग करुन सुरु करावेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे निर्देश

Advertisements

मजहर शेख

नांदेड , दि.२५ :- भाजीपाला अत्यावश्यक सुविधेत येत असल्याने भाजीपालाचे दूर-दूर अंतरावर मार्कींग करुन दुकाने ठेवण्यात यावेत. त्या-त्या ठिकाणावरील पोलीस विभागामार्फत सुरक्षा व्यवस्थेची मदत घेण्यात यावी. सकाळपासून 24 तास भाजीपाला दुकानावर विक्री करता येतील, परंतु ग्रामीण भागात 8 ते 11 यावेळेतच भाजीपाला विक्री करण्यात यावी. यावर तलाठी, ग्रामसेवक यांनी नियंत्रण ठेवावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आढावा बैठक घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, डॉ. वाय. आर. पाटील, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील, सहायक आयुक्त अजितपाल संधू, विलास भोसीकर, मिर्झा फरनुला बेग, गुलाम महमंद आदी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांना तीन महिन्यांचे अन्न धान्य देण्याचे नियोजन करण्यात यावे. अन्न-धान्याची अनियमितपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वार्डनिहाय नियोजन करुन धान्य वाटप करण्यात यावे. गर्दी होणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. तीन फुटाचे अंतरावर नागरिकांना उभे राहण्यासाठी मार्कींग करुन देण्यात यावे. स्वस्त-धान्य दुकानदारांना सॅनिटाझर व मास्क ठेवण्याचे सांगण्यात यावे. वार्डासाठी वेळा ठरवून देण्यात यावेत. अत्यावश्यक सुविधा असलेली अन्न-धान्य, औषधीची ने-आण करणाऱ्या वाहनांची माहिती जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांच्याशी मो. 9423255890 क्रमांकावर संपर्क साधावा.
किरणा दुकानदारांनी स्वयंसेवी व इच्छूक मुले त्यांच्यामार्फत घरपोच धान्य देण्यात यावे. दुकानासममोर त्यांनी फलक लावण्यात यावेत. किराणा दुकाने 24 तास चालू ठेवता येतील. ग्राहकांची यादी असेल, तर त्यांना फोनद्वारे सामानाची यादी मागवून घेवून त्यांना वेळ ठरवून देऊन सामान घेवून जाण्यास सांगण्यात यावे.
आरबीसी तपासणी पथक विमानतळ, रेल्वेस्टेशन, बसस्थानक याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांची पुणे-मुंबई येथून आलेल्या व्यक्तींना तपासणी करण्याबाबत समज देण्यात यावी. एम.एस. आणि टीएचओ यांनी याबाबतचे लेखी आदेश काढावीत. कोणतेही जिल्हा व तालुका स्तरावरील मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांनी कार्यवाही करावी. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष ठेवावे. खाजगी दवाखाण्यांची सुविधा बंद करण्यात आलेली ओपीडी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. ओपीडी चालू असल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांनी लेखी कळवावे. तालुकास्तरावर 50 बेड उपलब्ध करण्यात आली होती. परंतु आणखी अधिक 50 बेडची उपलब्धता करुन ठेवण्यात यावी. तालुकास्तरावरील खाजगी दवाखाने व व्हेंटिलेटर उपलब्ध असल्यास दवाखानानिहाय यादी तयार करावी. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास मास्कची किंमत रुपये दहा, तर सॅनिटाझरची रुपये शंभर अशी आहे. तेंव्हा तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध निधीतून खरेदी करुन देण्यात यावेत, उपलब्ध झाली नाही, तर जिल्हास्तरावर याबाबत माहिती कळविण्यात यावी.
तालुका स्तरावरील बचत गटामार्फत कापडी मास्क तयार करण्यात यावेत. मास्क दिवसा वापरून संध्याकाळी धुवून परत वापरता येतील. तसेच पोलीस, महसूल कर्मचारी यांना उपलब्ध करुन देण्यात यावे. आरबीसी तपासणी पथक विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी पुणे-मुंबई येथून आलेल्या व्यक्तींची तपासणी करावी.
दिवसातून एक वेळेस दुपारी फवारणी करण्यात यावी. स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने आवश्यक मदत घेता येईल त्याची माहिती घ्यावी. मॉलच्या ठिकाणी बाहेर फलक लावण्यात यावा. तसेच त्या ठिकाणी साबण किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुनच प्रवेश देण्यात यावा. घरपोच आवश्यक साहित्य देण्यात यावे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अंतर्गत रोजंदारांची जेवणाची व्यवस्था स्वंयेवी संस्थेमार्फत करण्यात यावी. स्वयंसेवी संस्था, आमदार, नगरसेवक यांच्या मदतीने गरजू नागरिकांना जेवणाची व्यवस्था करावी.
किराणा दुकानातील कामगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून ओळखपत्रे देण्यात येतील. यासंदर्भात नोडल अधिकारी म्हणून श्री. पी. जी. देशपांडे मो. 9923258261 यांच्याकडे संपर्क साधावा. वैद्यकीय औषधीचा जास्तीचा अनावश्यक साठा ग्राहकांना देण्यात येवू नये. शहरामध्ये स्वच्छता निरीक्षक यांच्यावतीने गरजूंना यांना आयडेंटीफाय (ओळखून) करुन त्यांना अन्न घरपोच देण्यात यावे. सुरक्षिततेसाठी आवश्यकता भासल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी.
मुंबई-पुणे येथून आलेल्या नागरिकांना त्यांचे घरी येण्यास मज्जाव करीत असलेल्या नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांची आरोग्य तपासणी करुन घरी क्वारंटाईसाठी ठेवण्यासाठी सांगून समज काढण्यात यावी.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव दूर करण्यासाठी कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, घरमालकांनी समजून घेण्याची गरज आहे. यासाठी सहकार्य कार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था काही मदत घेवून अन्नदान व इतर मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9822426849 व 02462-235303 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. हायपो क्लोराईडची फवारणी सर्व शहरी भागात मनपाने करावी. तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक, रेल्वे स्थानक च अन्य गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मगर म्हणाले की, भाजीपाला बाजार, किराणा दुकान या ठिकाणी गर्दी न करता आवश्यक अंतर ठेवण्यासाठी महसूल व पोलीस अधिकारी यांना मदत करावी. तालुकास्तरावर सॅनिटाझर व मास्क यांचा तुटवडा भासत असल्यास औषधी दुकानावर तहसिलदारांनी छापे टाकावेत.
सर्व तालुकास्तरीय अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवक यांनी मुख्यालयी रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात कामचुकारपणा केला तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी निर्देश देण्यात आले.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...