Home मराठवाडा किनगाव चौफुली येथील जिल्हा हद्दीवर चोख बंदोबस्त..!!

किनगाव चौफुली येथील जिल्हा हद्दीवर चोख बंदोबस्त..!!

76
0

अंबड प्रतिनिधी

जालना – अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली येथे प्रशासनाच्या वतीने कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा हद्द बंद केलेली आहे.या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

कोरोणा व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून किनगाव चौफुली येथे औरंगाबाद वरून तसेच पैठण कडून व बदनापूर कडून येणाऱ्या सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून चुकशी पोलीस करत आहेत.तसेच परजिल्ह्यातून येणार्यांना प्रवेश दिला जात नाही.यावेळी अनेक प्रवाशांना परतीचा मार्गी लावण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉन्स्टेबल डी.टी क्षीरसागर, पि.डी हिवाळे हे चोख कर्तव्य बजवतांना दिसले.