Home महत्वाची बातमी करोना बाधित देशातून आल्याची माहिती लपवल्या मुळे एकावर गुन्हा दाखल ,

करोना बाधित देशातून आल्याची माहिती लपवल्या मुळे एकावर गुन्हा दाखल ,

94
0

जिल्ह्यातील दुसरा गुन्हा दाखल ,

उडाली खळबळ ,

अमीन शाह

बुलडाणा , जिल्ह्यातील धामणगाव बढे येथे एक वयक्ती 13 मार्च रोजी करोना बाधित देश सौदी अरेबिया येथून आला होता त्याची माहिती त्याने प्रशासनाला दिली नवहती या संदर्भात येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून आज भारतीय दंड संहिता 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला करोना बाधित देशातून आल्या नंतर याची माहिती करोना नियंत्रण कक्ष व एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कशास माहिती देणे बंधनकारक होते परंतु याची माहिती त्यांनी दिली नाही येथील वैधकीय अधिकारी डॉ , सतीश नारखेडे हे सुद्धा त्यांच्या घरी गेले होते परंतु त्यांनी याची माहिती त्यांना दिली नाही परिणामी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,आज जिल्ह्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी मोताळा तालुक्यातील वडगाव येथे दोघनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या मुळे मोताळा तालुक्यात खळबळ उडाली आहे ,

Unlimited Reseller Hosting