Home मराठवाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश,

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश,

249
0

सय्यद नजाकत

जालना, दि. 24 – साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार गर्दी टाळण्यासाठी तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (१) (३) अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन होऊ नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच गावपातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या मुख्यालयी राहण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (४५) याच्या 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
*******