मराठवाडा

देगलूर येथील बाजारपेठ संचारबंदि च्या निमित्ताने कडकडित बंद

नांदेड , दि.२४ – ( राजेश भांगे ) –
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशा वरून नांदेड जिल्हाधिकारी श्री डाॕ. विपीन इटनकर यांनी दि.२३ मार्च ते ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यात संचार बंदिचे कडक आदेश दिल्याने देगलूर शहर पोलिस निरिक्षक धाबडगे यांनी ( हरकत ) मध्ये येवून देगलूर शहरवासियांना दि. २३ मार्च पासुन ते ३१ मार्च पर्यंत आपली सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले असता कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदित देगलूर शहर बाजारपेठेतील लहान मोठी अशी ( मेडिकल्स वगळता ) सर्व दुकाने कडकडित बंद असल्याचे दिसुन आले . तरी यावेळी पोलिस निरिक्षक धाबडगे यांनी भाजी पाला विक्रेत्यांना मंडई मध्ये गर्दी न होवु देता आपले भाजी पाला व फळे घरोघरी जावुन विकण्याचे निर्देश दिले.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752