Home मराठवाडा जिल्ह्यात करोना चा शिरकावच होणारच नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना – पालकमंत्री...

जिल्ह्यात करोना चा शिरकावच होणारच नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना – पालकमंत्री अमित देशमुख

25
0

राजेश भांगे

लातूर – करोना विषाणू / कोविड १९ चा प्रसार थांबवून लातूर जिल्ह्यातील जनतेला सुरक्षित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला.
लातूर जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग किंवा प्रसार होऊ नये यासाठी सामाजिक अंतर आणि सामाजिक जबाबदारी या दोन्ही गोष्टीचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी त्यासाठीची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

करोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवावी असे आव्हान करीत असताना या विषाणूंचा जिल्ह्यात शिरकाव होणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व इतर संबंधित यंत्रणांनी घेणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी ज्या व्यवस्था उभारावयाच्या आहेत, त्याची तातडीने पूर्तता करावी त्यासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. करोना चा प्रतिबंध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, जनतेनेही याकामी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे शक्यतो सर्वांनी घरीच थांबावे व सूचनांचे पालन करावे असे कळकळीचे आव्हान पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting