Home मराठवाडा बाहेर गावातील वयक्तींना गावात प्रवेश नाही गावातील नागरिकांनी गावाच्या बाहेर जाऊ नये...

बाहेर गावातील वयक्तींना गावात प्रवेश नाही गावातील नागरिकांनी गावाच्या बाहेर जाऊ नये ,

47
0

सययद नजाकत

बदनापूर, दि. 25 (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ढासला – पीरवाडी ग्रामपंचायतने विशेष ठराव घेऊन कोणत्याही गावाबाहेरी व्यक्तीस गावात न घेण्याचे व गावातील व्यक्तींना गाव न सोडण्याचा ठराव घेण्यात आला असून अनोळखी व्यक्ती दिसताच ताबडतोब ग्रामपंचायतला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बदनापूर तालुक्यातील ढासला व पीरवाडी हे जोड ग्रामपंचायत असून या ठिकाणी सद्यस्थितीत पाणी टंचाई जाणवत आहे. त्या अनुषंगाने या गावाचे सरपंच राम पाटील यांनी विशेष सभा बोलावून पाणी टंचाईबाबत आढावा घेऊन प्रशासनाला पाणी टंचाईचे गांभीर्य सांगून उपाययोजना करण्याबाबत करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावबंदीचा ठराव घेण्यात आला त्या अतंर्गत कोणत्याही बाहेरील व्यक्तीस गावात येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, गावातील कोणत्याही व्यक्तीने परवानगी शिवाय बाहेर जाऊ नये, आपल्या शेजारील घरी किंवा परिसरात अनोळखी व्यक्ती दिसल्यास ग्रामपंचायत कार्यालय किंवा सरपंच राम पाटील, ग्रामसेवक लाखोले,

शेख कादिर,, कदम,अशोक नाईक, मदन डोभाळ, रणजित डोभाळ किंवा पोलिस पाटील यांच्याकडे नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.