Home उत्तर महाराष्ट्र राजूर परिसरात संचार बंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या टवाळखोर दुचाकी स्वरांना राजूर पोलिसांकडून...

राजूर परिसरात संचार बंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या टवाळखोर दुचाकी स्वरांना राजूर पोलिसांकडून चांगलाच चोप.

236
0

राजूर – प्रतिनिधी

अहमदनगर – हातात काठी आणि २४ तास ड्युटी.महाराष्ट्र राज्यात संचार बंदी होऊन देखील राजूर परिसरात अनेक जण दुचाकीवर कायद्याचं उल्लंघन करतांना पाटील यांच्या निदर्शनास येताच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांनी कायद्याचा बडगा दुचाकी स्वारांना दाखवला.

कडक हेडमास्तर राजूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार त्यांचे सहकारी यांनी दुचाकी स्वार यांच्यावर राजूर येथील जुना नाट्य चौकामध्ये चांगला चोप देत त्यांच्यावर राजुर पोलीस स्टेशन मध्ये कडक कार्यवाही करत चांगलाच चोप देत या टवाळखोर दुचाकी स्वरांना कायद्याचा बडगा दाखवला.पाटील यांचा कोरोनाला हटविण्याचा निर्धार.राजूर शहर व परिसार आरोग्य हितासाठी व कोरोनोची साथ रोखण्यासाठी कडक हेडमास्तर तथा राजूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील.यांनी हातात काठी २४ तास ड्युटी असे धोरण अवलंबिले आहे.तरी काही टारगट लोकं प्रशासनाची अवहेलना करतांना दिसतात या अश्या लोकांमुळेच पोलिसांना कठोर कायद्याचा मार्ग अवलंबवा लागतो.जर हे पोलीस प्रशासन सज्ज नसले तर या रोगाचे बळी या महाराष्ट्र राज्यात अनेक पडतील.तरी नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे व या साथीला आळा घालण्यासाठी आप-आपल्या घरीच थंबून पोलीस प्रशासनांला व आरोग्य विभागाला, जनतेला व आपल्या भारत देशातील प्रशासनाला सहकार्य करावे.