Home मुंबई जमावबंदीच्या आदेशांच पालन न केल्यास पोलिस देणार खाकीचा दणका

जमावबंदीच्या आदेशांच पालन न केल्यास पोलिस देणार खाकीचा दणका

81
0

प्रतिनिधी मुंबई – रवि गवळी

मुंबई – मालाड पूर्व दफ्तरी रोड येथील 23/3/2020 रोजी जमाव बंदी असताना देखील नागरिक रस्त्यावर उतरले संचारबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन करतांना दिसत होते
काही लोकांनी विना कारण रस्त्यावर उतरले होते नागरिक हि गंभीर बाब मनावर न घेता मालाड पूर्व दफ्तरी रोड बचनीनगर रस्त्यारस्त्यावर घोळक्याने फिरत असल्याची बातमी ऑनलाईन बातमी प्रसारीत करण्यात आली होती .

त्याच्या इफेक्ट २४ ३ २०२० रोजी पाहण्यास मिळाला दफ्तरी रोड बचनीनगर पूर्व येथील लोकांची गर्दी रस्त्यावर विना कारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला नागरिकांना वारंवार प्रशासन कडुन सांगून सुध्दा नागरीक ऐकण्यास तयारच नसल्याने प्रशासन यांनी कठोर कार्यवाही करणार असल्याची सर्व मीडिया मध्ये प्रसारित केली नागरिकांनी जीवन आवश्यक वस्तू सामान खरेदी साठी बंदी नाही प्रशासन व पोलिसांनी कुठलीच जनरल स्टोअर पेपर स्टॉल हॉटेल इतर दुकाने चालू ठेवण्याचे वेळापत्रक परिपत्रक काढले नाही सोशल मिडिया वर मेसेज वर विश्वास ठेऊ नये अश्या अफवा प्रसारकरणाऱ्यावर पोलिस गुन्हे नोंद करीत आहे नागरिकांनी संयम बाळगायला हवा आपण सर्वांनी सतर्क रहाणे अतिशय
गरजेचे आहे. कोणत्याही जागी कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्क झाला आहे तिथे कुठल्याही
वस्तूचा कोरोना बसलेला आहे, जो आपल्या साध्या डोळ्याना दिसणार नाही. याची जाणीव
प्रत्येकाने ठेवली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने त्वरित शासनाने वेळोवेळी केलेल्या सुचानाचे
काटेकोरपणे पालन करून आपले स्वतःचे, कुटुंबाचे, मित्राचे, समाजाचे व देशाचे आरोग्य
सुरक्षित ठेवावे .