Home रायगड कर्जतमध्ये जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी, सर्वच ठिकाणी सन्नाटा!

कर्जतमध्ये जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी, सर्वच ठिकाणी सन्नाटा!

173

कर्जत – जयेश जाधव

कोरोना विषाणू युद्ध रोखण्यासाठी आज जनता कर्फ्यु चे आवाहन केले. कर्जतमध्ये औषधांची दुकाने वगळता उत्फुर्तपणे सर्वच व्यवहार पूर्ण पणे बंद ठेऊन जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी झाला. नेहमीच गर्दी असलेल्या बाजारपेठा, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड अगदी शांत होते. सर्वच ठिकाणी सन्नाटा होता.


जगभरात एकच चर्चा सुरू आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी’कोरोना’ शब्द ऐकायला मिळतो. कोरोना विषाणूला कसा आळा घालता येईल याची उपचार पद्धती अद्यापही तज्ञांना संशोधनातून शोधून काढता आली नाही. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच आज रविवारी ‘जनता कर्फ्यु’ जाहीर केला आहे. कर्जतमध्ये जनता कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी झाला. औषधांची दुकाने वगळता सर्वच व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद होते. एरव्ही बंद असल्यावर मोकळ्या झालेल्या रस्त्यावर लहान मुले क्रिकेट खेळायची ते दृष्यही पहावयास मिळाले नाही. सर्वच ठिकाणी सन्नाटा होता.
एरव्ही नेहमीच वाहतूक कोंडी होणारा कर्जत चारफटा, श्रीराम पूल ओस पडलेले दिसत होते. आणीबाणी जाहीर झाल्यासारखे सर्वच जण आपापल्या घरात होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक अरुण भोर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व ठिकाणी लक्ष ठेऊन होते. कोरोना पासून देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी जे आपल्या जीवाची बाजी लावत आहेत त्यांचे कौतुक करण्यासाठी सायंकाळी बरोबर पाच वाजता अनेक नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळीनाद तर काहींनी टाळ्या वाजविल्या.
‘आजच्या दिवसाचा अनुभव वेगळाच होता. सर्वच व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद होते.