Home मराठवाडा करोना विषाणू चा नयनाट करण्यासाठी बदनापूर येथे अलगिकरन केंद्र सुरू होणार ,

करोना विषाणू चा नयनाट करण्यासाठी बदनापूर येथे अलगिकरन केंद्र सुरू होणार ,

346
0

अधिकाऱ्यांनी केली पाहणी ,

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी
शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्याचा एक भाग म्हणून बदनापूर येथे अलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असून आज समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या शेजारील इमारत यासाठी अधिगृहित करण्याच्य दृष्टीने उपविभागीय अधिकारी डॉ.केशव नेटके यांनी पाहणी केली असून येथे अलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी आदेश काढून सर्व तालुक्यात अलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत आदेशीत केले असून यासाठी तहसीलदारांना अलगीकरण कक्षाचे नियंत्रक म्हणून काम पाहण्याचे व संपूर्ण व्यवस्थापन करण्याचे आदेशीत करण्यात आलेले आहे. या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ.केश्व नेटके, तहसीलदार छाया पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओम ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळुंके, सुरेश वाठोरे यांनी आज बदनापूर येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाशेजारीच इमारत अलगीकरण कक्षासाठी अधिगृहित करण्यासाठी पाहणी केली असून या ठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
——————-
छाया पवार -नियंत्रक अलगीकरण कक्ष तथा तहसीलदार
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे यांच्या आदेशाने कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्याचा एक भाग म्हणून बदनापूर येथे अलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असून १०० खाटांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे,मुंबई ,पुणे आदी भागातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून आपली तपासणी करून घ्यावी