Home मराठवाडा नागरिकांनी दक्षता घ्यावी सहकार्य करावे बंद चे पालन करावे प्रशासनाचे आवाहन ,

नागरिकांनी दक्षता घ्यावी सहकार्य करावे बंद चे पालन करावे प्रशासनाचे आवाहन ,

17
0

नागरिकांनी दक्षता घ्यावी सहकार्य करावे बंद चे पालन करावे प्रशासनाचे आवाहन ,

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी

शासनाने आव्हान करून देखील काही मंडळी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत असून दोन दिवसापूर्वी बदनापूर शहरात मुंबईहून परतलेला कोरोनाचा एक संशयीत २३ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी गर्दी न करता घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिस व तालुका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 लावण्यात आलेले असून सर्वत्र खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तरीही काही ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्यामुळे तालुका प्रशासन व पोलिस प्रशासनमार्फत जमावबंदीचे आदेश धुडकवणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. दरम्यान बदनापूर तालुक्यातील एक नागरिक मुंबई येथे नोकरीहून आल्यानंतर त्याने स्वतःची टॅप्सनी करून घेतली नाही मात्र २३ मार्च रोजी स्वत:च बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. यामुळे कोरोना संशयीत थेट बदनापूरच्या दारावर दिसून आल्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता वैद्यकीय सूत्रांनी दिलेली आहे.
या बाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळुंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी सदरील रूग्ण हा कोरोना बाधीत आहे की नाही यासाठी या रूग्णाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहे , त्याला वेगळे ठेवण्यात येऊन त्याच्यावर उपचार सुरू आहेत,सध्या त्या व्यक्तीला ताप असून या रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याला वेगळे ठेवण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. सदरील रुग्ण मुंबईहून औरंगाबाद पर्यंत आला होता, तेथून २२ मार्च रोजी सकाळी मोटारसायकलने बदनापूर येथे आला असून मुंबईहून येत असताना त्याच्यासोबत आणखी एक नागरिकांने प्रवास केलेला असून तो नागरिक नांदेड येथे गेलेला असल्याची माहिती मिळत आहे.
————————
मारुती खेडकर -पोलीस निरीक्षक
कोरोना रोगाला प्रतिबंध उपाययोजना म्हणून नागरिकांनी गर्दी करू नये त्या दृष्टीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशाने कलम १४४ लागू करण्यात आली आहे तरी देखील काही मंडळी जाणीवपूर्वक गर्दी करीत आहे,कायद्याचे उल्लंघन केल्यास कोणाचीच गय केली जाणार नाही थेट गुन्हे दाखल केले जातील
———————
छाया पवार -तहसीलदार
सध्या कोरोना व्हायरस वाढत असल्याने शासन उपाययोजना आखत आहे,बदनापूरसह तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहे केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे,मुंबई,पुणे आदी शहरात कोरोना प्रादुभाव वाढल्याने अनेक जण गावाकडे प्रस्थान करीत असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी अत्यन्त आवश्यक असल्याने त्या नागरिकंनी स्वतःचा आणि घरातील इतर व्यक्तीसहीत अन्य लोकांचा विचार करून स्वतः वैधकीय तपासणी करून घ्यावी