Home विदर्भ जिल्हयात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची वसुली थांबवा – मनसे उपाध्यक्ष राजु...

जिल्हयात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची वसुली थांबवा – मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

241
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. २३ :- जिल्ह्यात कोरोना रोगांचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉक डाउन व कलम १४४ लागू केलीली असतांना ही, सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून मायक्रो फायनान्स कंपन्या दररोज शेकडो महिलांना एकत्र करून वसुली करत असल्याने या कंपन्यांची वसुली काही काळा पुरती थांबविण्याची मागणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
संपुर्ण जगात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉक डाउन व जमाव बंदीचे आदेश दिलेले असतांना ही, मायक्रो फायनान्स कंपणीचे प्रतिनिधी जिल्ह्यात दर दिवसाला हजारो महिलांना एकत्रित करून, सक्तीची वसुली करत आहे. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येऊन या रोगाचा प्रसार होऊन विषाणू संसर्गबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या मायक्रो फायनान्स कडून जिल्ह्यात कलम १४४ चे सर्रास उल्लंघन होत आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असतांना व या रोगाच्या संक्रमना पासून वाचण्यासाठी ग्रामीण भागातील मजूर वर्ग आज घरात बंदिस्त असल्या कारणांमुळे त्यांना मजुरी मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न मजूर वर्गांना पडला असतांना त्यात या मायक्रो फायनान्स कंपनीच्या धाकदपट करून केल्या जात असल्याची सक्तीची वसुली, यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्ग प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण या मायक्रो फायनान्स कंपन्यांना काही काळापुरती वसुली थांबविण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी राजु उंबरकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.