Home महत्वाची बातमी “कोरोना वायरस” कितना भी बुलाव जानेका नै….

“कोरोना वायरस” कितना भी बुलाव जानेका नै….

85
0

“ताई माई आक्का विचार करा पक्का” तुम्हीच आहे तुमच्या घरातील हुकमाचा एक्का”यामुळे घरातील लहान थोर व्यक्तींची काळजी घेण्याची जबाबदारी ही महिला वर्गावर आलेली आहे.विधानसभा लोकसभेची राजकीय धुळवड संपली असल्याने राजकारणी लोकांना आता जनतेची गरज किमान चार वर्षे तरी राहिली नसल्याने “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हे वामनराव पै याचे वाक्य आचरणात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे.नेत्यांचा निवडून येण्याचा कार्यभाग उरकल्याने त्यांना आता जनतेची फारशी गरज नाही कोरोना संसर्गापासून जे काही जगतील वाचतील त्यांच्या पुढे हात पसरायला नेते मंडळी पुन्हा येणार आहे परंतु “बुलाता है मगर जानेका नै”हे वाक्य आचरणात आणावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे बाजीप्रभू प्रमाणे खिंड लढवत आहेत कोरोना आजार हद्दपार झाल्याशिवाय तोफांचे आवाज होणार नाहीत याची कल्पना त्यांना आहे.यामुळे उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करून लढाई सुरू आहे गरज आहे फक्त जनतेने साथ देण्याची प्रशासन जीव तोडून मेहनत घेत आहे पोलीस यंत्रणा चोवीस तास रस्त्यावर उभी आहे परंतु जनता निष्काळजी असल्याने प्रशासन हतबल होत आहे.

चीन,इटली अमेरिका सारखे देश आज बंदिस्त झाले आहेत जगात सर्वात पुढारलेले देश कोरोना मुळे आज मागे पडले असून आपला भारत देश लढाऊ बाण्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र जनतेची साथ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.इतरांसाठी नाही तरी स्वतः साठी तरी काळजी घ्या आणि कोरोना चा सामना एकजुटीने सामना करूया

पत्रकार अनिल कदम

Unlimited Reseller Hosting