Home मराठवाडा ट्रॅक च्या धडकेने रस्ता ओलांडत असतांना अनोळखी इसमाचा मृत्यू ,

ट्रॅक च्या धडकेने रस्ता ओलांडत असतांना अनोळखी इसमाचा मृत्यू ,

31
0

बदनापूर/सय्यद नजाकत

रस्ता ओलांडत असतांना समोरून भरघाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या इस्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,सदर अपघात 21 मार्च रोजी रात्री 8 वाजे दरम्यान बदनापूर बस थांब्याजवळ घडला मात्र सदर इस्माचे नाव कळू शकले नाही
या बाबत अधिक माहिती अशी की,21 मार्च रोजी रात्री 8 वाजेदरम्यान बदनापूर बस थांब्या जवळ एक इसम रस्ता ओलांडत असताना जालण्याकडून औरंगाबाद कडे भरघाव वेगात जाणारा ट्रक क्रमांक एम एच 40 ,वाय 0650 च्या चालकाने जोराची धडक दिल्याने इसम खाली पडला व डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला असता नागरिकांनी तातडीने उचलून दवाखाण्यात पाठविले मात्र गंभीर जखमी असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचत करून जालना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे
घटना घडल्यानंतर ट्रक चालकाने माराच्या धास्तीने पोलीस ठाणे गाठले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रक ताब्यात घेतलेला आहे मात्र उद्याप गुन्हा दाखल झालेला नाही

Unlimited Reseller Hosting