Home बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबत कुठलाही आदेश नाही

बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबत कुठलाही आदेश नाही

240
0

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेपोलीसवाला टीम ,बुलडाणा, दि. 19 : जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबत कुठलेही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेले नाहीत. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याबाबत अफवा पसरवली जात आहे. या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद असणार नाहीत याबाबत जे 31 मार्च 2020 पर्यंत बंद करावयाचे होते त्याचे आदेश काढण्यात आलेले आहे मात्र पेट्रोल पंप बंद असल्याबाबत कुठलेही आदेश नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. तसेच अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी यांनी केले आहे.