Home महत्वाची बातमी दमदार नामदार राजेशभैय्या टोपे यांचे होतेय सर्वत्र कौतुक, आई दवाखान्यात असताना आरोग्यमंत्र्यांचा...

दमदार नामदार राजेशभैय्या टोपे यांचे होतेय सर्वत्र कौतुक, आई दवाखान्यात असताना आरोग्यमंत्र्यांचा कोरोना साठी राज्यात झंझावात

157

परतुर प्रतिनिधी/लक्ष्मीकांत राऊत

महाराष्ट्र कोरोना च्या संकटात सापडला आणि यातून मार्ग काढण्याचे कठीण काम आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांच्यावर आपसुक पडले. त्यांची आई विविध आजाराचा सामना करत मुंबईत दवाखान्यात दाखल असताना आईच्या सेवेला पुरेसा वेळ त्यांना देता येत नाही, कोरोना ची जबाबदारी कोशल्यपूर्वक उचलून टोपे यांनी ज्या समर्थपणे आरोग्य विभागाला चालना दिली आणि यामुळे कोरोना सारखा व्हायरस पसरण्याला निश्चित पायबंद बसतो आहे.जालना जिल्ह्याची मान पालकमंत्री टोपे यांच्या कार्याने अभिमानाने उंचावली आहे. कठीण परिस्थितीत ही कोरोना साठी अहोरात्र झटणारा हा दमदार नामदार सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे.
कॅबिनेट मध्ये आरोग्य मंत्री म्हणून काही महिने झाले आणि देशावर कोरोना संकट उभे राहिले. त्यातल्या त्यात महाराष्ट्र देशात जास्त रुग्ण असलेले राज्य म्हणून समोर आले. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून मोठी जबाबदारी राजेश टोपे यांच्यावर आपसूकच आली,एकीकडे कोरोना सारख्या महाभयानक संकटाला सामोरे जायचे दडपण यंत्रणा राबवण्याची, उपाययोजना करताना होणारी धावपळ तर दुसरीकडे आई रुग्णालयात उपचारासाठी दाखल ,त्यांची मोठी सत्व परीक्षा घेतली जात होती,पण या परीक्षेत ते नुसते पास झाले नाही तर मेरिट मध्ये आले.आमचे पालकमंत्री किती कर्तव्यदक्ष, किती कार्यक्षम हे साऱ्या राज्यातील जनतेने अनुभवले व अनुभवत आहेत.परतुर मंठा मतदार संघ काँग्रेस विचारसरणी ला प्राधान्य देत आलेला नसला तरी आज पालकमंत्री टोपे यांचे मनापासून कौतुक ,अभिनंदन करतो आहे, त्यांच्या कुशल प्रशासनिक कार्याला सलाम करतो आहे हे निश्चित.