Home महत्वाची बातमी एसटीमध्ये एका आसनावर एकच प्रवासी

एसटीमध्ये एका आसनावर एकच प्रवासी

66
0

राजेश भांगे

प्रवाशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने एसटीच्या गाडय़ांमधील बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार एसटीमध्ये एका आसनावर एकच प्रवासी बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत राज्य परिवहन महामंडळाने सर्व आगारांना सूचना पाठविल्या आहेत.
सुरक्षित अंतर ठेवा ही योजना राबवून प्रवाशांमधील संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी गाडीतील बैठक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. दोन आसनक्षमतेच्या बैठक व्यवस्थेमध्ये केवळ एकच प्रवासी बसविला जाणार आहे. पुढील आसनावर प्रवासी उजव्या बाजूला बसला, तर त्या मागील आसनावरील प्रवासी डाव्या बाजूला बसेल. त्याच्या शेजारील आसनावरी प्रवासी उजव्या बाजूला बसेल. अशा पद्धतीने एसटीतील बैठक व्यवस्था असेल.

केवळ ५० टक्केच प्रवासी घेऊन बस मार्गस्थ केली जाईल. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. गरज भासल्यास जादा बसची व्यवस्था करण्यात येईल. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन एसटीकडून करण्यात आले आहे.