Home उत्तर महाराष्ट्र कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभुमीवर आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्‍या सुचनेप्रमाणे पाचोरा नगरपरिषदेत सुरक्षा...

कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभुमीवर आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्‍या सुचनेप्रमाणे पाचोरा नगरपरिषदेत सुरक्षा साहित्‍य वाटप

14
0

निखिल मोर

जगभरात करोना आजाराने थैमान घातले असून, राज्यातदेखील शिरकाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात खराबदारीचा उपाय म्हणून सोमवारी (दि.16/03/2020 रोजी) आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा नगरपरिषद सर्व विभागप्रमुख यांचे सोबत कोरोना विषाणू व्‍हायरस संसर्ग टाळण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजना यासाठी आढावा बैठक घेण्‍यात आली. आज नगरपालिकेने तात्‍काळ जंतूनाशके, फवारणी औषधे, साफसफाई साहीत्‍य, कर्मचा-यांना मास्‍क, ग्‍लोज इ.साहित्‍याचा साठा खरेदी केलेला आहे. तसेच सर्व सफाई कामगारांच्‍या सुटया पुढील आदेश होईपावेतो रद्द करण्‍यात आलेल्‍या आहेत. या पार्श्‍वभुमीवर दिनांक 17/03/2020 रोजी म.अध्‍यक्ष सो. संजय गोहील, उपनगराध्‍यक्ष शरद पाटे यांच्‍या, मुख्‍याधिकारी श्रीमती शोभा बाविस्‍कर, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले,आरोग्‍य निरीक्षक धनराज पाटील, कर निरीक्षक दगडू मराठे, संगणक अभियंता मंगेश माने, उपअवेक्षक किरण बाविस्‍कर, भारती निकुंभ, सुधीर पाटील, ललित सोनार आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.