Home मराठवाडा अंबड हे महाराणी गौतमाबाईसाहेब होळकर यांचे खाजगीचे वतन

अंबड हे महाराणी गौतमाबाईसाहेब होळकर यांचे खाजगीचे वतन

30
0

महात्मा फुले (चक्री)चौकात विविध सामाजिक संघटनाकडुन मल्हारबांना जयंतीनिमित्त अभिवादन…!

जालना / अंबड – मराठा साम्राज्याचे महापराक्रमी सेनापती थोरले मल्हारराव होळकर यांच्या जंयतीनिमित्त अंबड शहरातील महात्मा फुले (चक्री)चौकात अभिवादन कार्यक्रम दि.१६ मार्च रोजी संपन्न झाला
सुभेदार मल्हारराव होळकर पत्नी गौतमाबाईसाहेब यांना थोरल्या छत्रपती शाहु महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांच्या कडुन अंबड हे खाजगी जहागिरीच्या स्वरुपात मिळाले होते सुभेदार मल्हारराव होळकर यांनी अंबड येथील खंडोबा बिल्केश्वर मंदिर निर्माण करुन हजरत बियाबानी दर्गा बांधण्यासाठी पन्नास हजार रुपये दिले तर दर्गा आणि मंदिराच्या देखभालीसाठी शेकडो एकर जमिनी इनाम म्हणून बहाल केलेल्या आहेत.अंबडची जडण घडण आणि पुनः निर्मिती ही मल्हारबांच्या काळात झालेली असल्याचे प्रतिपादन होळकर रियासतीचे अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी केले.

यावेळी उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी, रासपचे नेते अशोक लांडे,सभापती गंगाधर वराडे,सावता परिषदेचे विष्णु पुंड,गटनेते शिवप्रसाद चांगले दै.पुण्यनगरी चे सुरेश भावले,संतोष अग्रवाल, राजुशेठ मालानी,बाळासाहेब तायडे,शकील भाई,अथर काजी, स्वयंभु ग्रुपचे सचिन खरात यशवंत लोहकरे,जनार्धन खरात, जय खरात,मोईन शेख,दत्ता लोहकरे, सौरभ मंडलिक, संदिप खरात,जगदंबा ग्रुपचे दिपक लोहकरे, प्रदिप वैद्य, अर्जुन भोजने,सनी राठोड,मयुर बागडे,भैय्या भोजने, इश्वर सोनसळे, कु.अश्विनी वैद्य, सौ .लबासे,सौ.मापारे, सौ. ढोले संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीष ढवळे,जिल्हा सचिव जगन काळे,मारोती दिवटे शिवसेनेचे शहरप्रमुख सुशिलकुमार रुपवते,विनायक चोथे,प्रकाश इंगळे,दिपक खरात,पटेकर सर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत दिलपाक,रिपब्लिकन सेना युवा जिल्हा अध्यक्ष राहुल व्ही खरात,महाराष्ट्र सेना ता.आ.प्रल्हाद तुपसौनदर,रिपब्लिकन सेना ता सचिव आंनद म्हस्के,रिपब्लिकन सेना शहर अध्यक्ष अंकुश खुळे,रिपब्लिकन सेना पारनेर सर्कल प्रमुख शाहिर दिलीप खरात,संजय नाडे, मारोती कुराडे, भिमराज युवा संघटना ता.आ.सतीश बोराडे,राजू खुळे, श्रीराम मोरे,जीजा उघडे सह आदी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting