Home जळगाव ७६ व्या दिवशी धरणे आंदोलन स्थळी कोरोनाची यथायोग्य काळजी घेऊन सुरूच

७६ व्या दिवशी धरणे आंदोलन स्थळी कोरोनाची यथायोग्य काळजी घेऊन सुरूच

83
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच च्या माध्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीला विरोध म्हणून धरणे आंदोलनाचा ७६ वा दिवस या दिवशी आंदोलन स्थळी सैनिटा इज़र व मास्क चा वापर करण्यात आला एवढेच नव्हे तर आंदोलन स्थळी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सैनी टायझर व मास्क उपलब्ध करून देण्यात आले.
*कोरोना या रोगाची काळजी घेऊ परंतु धरणे आंदोलन बंद करणार नाही*
कोरोना व्हायरस बाबत शासन प्रशासनाची नोटिस मंच चे समन्वयक फारुक शेख यांना प्राप्त झाली त्यापूर्वीच योग्य ती दखल घेऊन ७६ व्या दिवसाच्या धरण्याला सुरुवात करण्यात आली होती त्यात धरणे आंदोलन ठिकाणी प्रत्येकाच्या हातावर सैनीटायझर लावून त्यांना आत बसवले जात होते महिलांच्या तोंडावर ऑल रेडी परदा बांधलेला होता तर पुरुषांनी मास्क व रुमाल बांधून ठेवले होते
*धरणे आन्दोलन सुरुच राहणार*

धरणे आंदोलनात आन्दोलकांची संख्या कमी करू परंतु आन्दोलना चालूच ठेवू असा निर्धार यावेळी मंच चे समन्वयक फारुक शेख, यांनी व्यक्त करतास त्यांना दारुल क़ज़ा चे मुफ़्ती अतिकुर रहमान,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक मौलाना आझाद विचार मंचचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष करीम सालार, सुन्नी मस्जिद चे इक्बाल वजीर, जमीअत उलमा चे हारून नदवी, माजी प्राचार्य इकरा चे डॉक्टर इक्बाल शाह ,नूतन मराठा कॉलेज चे माजी विभाग प्रमुख डॉक्टर एम इक्बाल, कूल जमातीचे सय्यद चाँद, वहीदत इस्लामी चे अतिक शेख, जमात-ए-इस्लामी चे मुस्ताक शेख, एस आय ओ चे हातिम देशमुख,एस आई जी नीलोफर एकबाल, एमपीजे चे आरिफ देशमुख ,सिकलिगर जमातीचे अन्वर खान पिंजारी बिरादरीचे हारुन पिंजारी मनियार बिरादरीचे ताहेर शेख व हारून शेख, जामा मजीद चे विश्वस्त सलीम शेख, ईद गाह चे अनीस शाह, यांनी अनुमोदन दिले.
*महिलांचे सुद्धा अनुमोदन* सुलताना बी,रुबीना शेख इक्बाल, आलिया शेख नईम, मशिरा शेख शकील ,रशीदा शेख इद्रीस, सोफिया शेख निसार, जुबेदा सय्यद, मारिया सय्यद हरीश, नजमा बी शेख हुसेन ,यास्मिन सय्यद अमरला, शबीना सय्यद हरीश, जमीला शेख लतीफ, रुकसाना बी, सणा रफीक, सलमा मोहंमद, शहनाज बी रशीद शेख, मारिया साजिद सलीम, अलमास शेख रफिक, फरजाना शेख, रुबीना शेख इक्बाल शेख, मुमताज आदींनी सुद्धा आंदोलन सुरूच करावे सुरू ठेवावे अशी आर्त हाक दिली

*पोस्टर व स्टिकर चे अनावरण*
कोरोना व्हायरस या रोगापासून स्वतःला व इतरांना होऊ नये म्हणून घेण्याविषयी काळजीचे आंदोलनस्थळी पोस्टर लावण्यात आले त्याच प्रमाणे मास्क व सैनिटायझर चे स्टीकर सुद्धा लावण्यात आले त्याचे विधिवत पुरुष व महिलांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

*यांनी केले मार्गदर्शन*
आमीन बादली वाला ,सोफिया शेख निसार, रशीद शेख इद्रीस, अल्ताफ शेख ,मुजाहिद शेख, गफ्फार मलिक, करीम सालार, फारुक शेख यांनी मार्गदर्शन केले

*उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*

फारुक शेख यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची ची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यापूर्वी तत्यांचे हात सुद्धा सैनिटाइजर ने स्वच्छ करण्यात आले व मास्क लावण्यात आला.
आंदोलका तर्फे हारुन शेख करीम ,खलील अहमद कदीर खान ,नजमा बी शेख अन्सार, सलमा सय्यद युनूस , यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.