Home मराठवाडा सत्यपाल महाराज्यांच्या हस्ते माणुसकी सलुन मध्ये वाचनलयाचे उदघाटन ,

सत्यपाल महाराज्यांच्या हस्ते माणुसकी सलुन मध्ये वाचनलयाचे उदघाटन ,

75
0

“हेअर सलुन बनले ज्ञानभंडार”
▪हेअर सलुनमधे आता पुस्तकं वाचनाचीही सुविधा▪जटवाडा रोड सारा वैभव समोरील महाराष्ट्रातील पहिले ‘सलुन-वाचनालय’▪वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी माणुसकी सलुनचा व सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

अब्दुल कय्युम

औरंगाबाद / आजची पिढी मोबाईलच्या मोहजाळात अडकलेली असल्याने वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. पुस्तकांशी लोकांचे नाते दुरापास्त होत चालले आहे. अशा परिस्थितीत लोकांना पुस्तकांशी मैत्री करण्याच्या उदेशाने येथील माणुसकी सलुनने थेट सलुनमधेच वाचनालय उघडले असुन, लोकांमधे वाचनसंस्कृती वाढीस लावण्याचा प्रयत्न यानिमित्ताने सुरु करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलुनमधे वाचनालय असलेला हा महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव उपक्रम ठरला आहे.
उदरभरणासाठी केशकर्तनाचा व्यवसाय करणारे सुमित पंडीत हे आपल्या समाजसेवेसाठीही ओळखले जातात. स्त्रीभ्रुण हत्या, स्त्रीशिक्षण, बेटि बचाओ बेटि पढाओ, वृक्षसंवर्धन, पाणीजतन, रुग्णसेवा, निराधारांसाठी मदतकार्य अशा मुलभुत सामाजिक प्रश्नांसाठी ते विविध उपक्रम राबवित असतात. लोकांमधे वाचनाचीही आवड निर्माण व्हावी असाही त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी जटवाडा रोड येथील आपल्या माणुसकी सलुनमधे थेट वाचनालयाचीच सुरुवात केली आहे. १४ मार्च रोजी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
सलुनमधे येणारे ग्राहक कटींग, दाढी, फ़ेशियल आदींसाठी येतात. दुकानात गर्दी असेल तर लोक गप्पांमधे वेळ घालवतात किंवा आपल्या मोबाईमधे गुंततात. आज माणसाकडे असलेला प्रत्येक क्षण बहुमोल आहे. तेव्हा गप्पा किंवा मोबाईलवर मोलाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामासाठी या वेळेचा वापर व्हावा या हेतुने सुमित पंडीत यांनी सलुनमधेच वाचनालय सुरु करण्याची योजना आखली. यासाठी मुख्यमंत्र्यांचे सहायक सचिव विकास खारगे यांचे प्रोत्साहन त्यांना मिळाले आहे. परदेशात अशाच एका सलुनमधे वाचनालय सुरु केले असल्याचे सांगून माणूसकी सलुनमधे देखील अशाप्रकारचा उपक्रम सुरु करण्याचे खारगे यांनी पंडित यांना सुचविले आणी हे सलुन-वाचनालय प्रत्यक्षात अवतरले आहे. सलुनमधे एक विशेष जागा करुन तेथे ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील हे बहुतेक एकमेव सलुन-वाचनालय असल्याचे पंडित सांगतात.
ग्राहकाच्या ज्ञानात भर पडेल तसेच मनोरंजन होईल अशा प्रकारच्या पुस्तकांचा समावेश यात केला आहे. येथे सर्व वयोगटातील ग्राहक येत असल्याने पंडीत यांनी माणुसकी सलुन-वाचनालयामधे सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी पुस्तके ठेवली आहेत. यात लहान मुलांसाठी कथा, समान्यज्ञान, कार्टुन्स, तरुणांसाठी अभ्यासात्मक पुस्तके, ज्येष्ठांसाठी कादंबऱ्या अशा पुस्तकांचा समावेश केला आहे. सलुनमधे आपल्या क्रमांकाची प्रतिक्षा करत असलेल्या ग्राहकांना वेळेचा सदुपयोग करुन पुस्तकवाचनातुन ज्ञानवृद्धी होणार आहे. त्यांच्या ह्या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.सत्यपाल महाराजांनी सुमित पंडीत यांच्या कामाचे कौतुक करत महाराजांनी त्याच्याकडिल बरेचशि पुस्तके भेट देत माणुसकी सलुन मधील वाचनलयाचे मोठ्या थाटात उद्घाटन सत्यपाल महाराजांच्या हस्ते करन्यात आले.

“पुस्तक आपले खरे मित्र”
▪पुस्तक हे माणसाचे खरे मित्र असतात. त्यातुन योग्य दिशा व ज्ञान मिळते. मात्र आज लोक पुस्तकापासुन दुरु होत चालली आहेत. लोकांमधे वाचनसंस्कृती वाढीस लागावी यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. यात लोकांच्या सहकार्याने पुस्तकांचा समावेश होत आहे.

-सुमित पंडीत (माणुसकी सलुन-वाचनालय)

वाचनालय सुरु करने हि काळाची गरज आहे सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज
प्रसंगी महाराज बोलतांना म्हणाले की बरेच दिवसांपासून समाजसेवक सुमित पंडित यांच्या माणुसकी सलून येथे आगळेवेगळे काहिना काही उपक्रम चालुच असतात देशासाठी संरक्षण करणाऱ्यां जवानांची चांदिच्या वस्ताऱ्याने मोफत मध्ये दाढी कटिंग केल्या जाते. तसेच ज्यांना कोणाला मुलगी झाली त्यांना 2 महिने 21दिवस मोफत दाढी कटिंग केल्या जाते. असे आगळे-वेगळे व्यक्तीमत्व पाहायला मिळाले. आणि हेअर कटिंग सलुन मध्ये पुस्तकाचे वाचनालयाचे सुध्दा माझ्या हस्ते उद्घाटक माझ्या हस्ते झाले मला आनंद आहे भाऊ “ज्याचा घरी नाही पुस्तकाचा खोपा’ त्याचे घर होईल भुईसपाट म्हणते आम्ही वाचले नाही आणि या अशा 26वर्षीच्या न्हाव्याच्या पोरान क्रांती करुन दाखवली. की मी न्हावी कटिंग सलुनच्या दुकानात सुध्दा वाचनालय चालू करु शकतो.आणि समाजामध्ये प्रबोधन करु शकतो, मी धन्यवाद देतो, की तुमच्या कार्याचा सर्वांनी अशा आदर्श घ्यावा. हा आम्हाला अभिमान आहे तुमचा की संत शिरोमणी सेना महाराजांच्या रक्ताचा, विचारा माणूस हेअर कटिंग सलुन वाला की ज्याची दृष्टी ऐवढी सखोल आहे. ऐवढा विचार खोल आहे. अश्या या व्यक्तिमत्वाला खुप खुप शुभेच्छा देतो व पुढील सामाजिक कार्याच्या वाटचालीसाठी सुध्दा चांगले यश लाभो अशी प्रार्थंना संत गाडगेबाबा यांच्या चरणी करतो.
——-सत्यपाल महाराज

उद्घाटनप्रसंगी सत्यपाल महाराज,
व त्याचे सर्व हसकारी व साय्यक पोलीस आयुक्त हणुमान भापकर साहेब, चंद्रशेखर डोनगावकर,पाटबंधारे विभाग गजानन पींजरकर,मुक्ताराम गव्हाणे,भरत कल्यानकर, गजानन क्षिरसागर,समाजसेवक सुमित पंडित,सुनिल चिंचोनकर,कल्पेश पंडित,गनेश वाघ,ज्ञानेश्वर पंडित,विष्णु बोर्डे,आदि उपस्थित होते.