Home मराठवाडा मुक्रमाबाद येथे मटका बुकीवर धाड , “दोन जणांवर गुन्हा दाखल”

मुक्रमाबाद येथे मटका बुकीवर धाड , “दोन जणांवर गुन्हा दाखल”

15
0

नांदेड , दि. १६ – ( राजेश भांगे) :-
मुक्रमाबाद येथील एका मोबाईल दुकानात मटका बुकी चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिस प्रशासनास मिळताच दि.१३ शुक्रवार रोजी धाड टाकून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे काहि दिवसापासून एका मोबाईल शाॕपी दुकानात आँनलाईन कल्याण नावाचा मटका चालवत असल्याची माहिती मिळताच नांदेड जिल्हा अप्परपोलिस अधिक्षक दत्तराम राठोड यांच्या पथकाने मोबाईल दुकानावर धाड टाकली असता यामध्ये आरोपी सुरेश एलप्पा एमेकर रा.मुक्रमाबाद, व कासगीर रामेश्वर गिरी रा.डोरनाळी ता.मुखेड हे दोघेजण कल्याण मटका घेताना व खेळवताना दिसुन आले व त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल किंमत विस हजार रुपये व चौत्तीस हजार रुपये नगदी असा एकुण चौप्पन हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन दोन जणावर कारवाई करण्यात आली.
नांदेड जिल्हा अप्परपोलिस अधिक्षक दत्तराम राठोड यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे यांच्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात आरोपी सुरेश एलप्पा एमेकर,व कासगीर रामेश्वर गिरी या दोघांवर कलम १२ (अ)प्रमाणे मुंबई जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आसुन या प्रकरणी पुढील तपास बिट जमादार शिवाजी आडेकर, पो.काॕ.ईबितवार करित आहेत.