Home मराठवाडा देगलूर शहरात कोरोना आजाराचा पेशंट आल्याची जोरदार अफवा

देगलूर शहरात कोरोना आजाराचा पेशंट आल्याची जोरदार अफवा

69
0

नांदेड , दि. १७ :- ( राजेश भांगे ) –
देगलुर शहरात कोरोना आजाराचा रूग्ण आला असल्याची अफवा होवुन नागरिकात भितिचे वातावरण निर्माण झाले होते. तरी या संर्भात उपजिल्हा रूग्णालयात संपर्क केले असता
डाॕं. संभाजी वसंतराव पाटिल वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रूग्णालय देगलूर यांनी नागरिकांना अव्हान केले कि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच सदरील रूग्ण तडखेल येथील रहिवासी असुन गेली दोन वर्षा पासुन तो सौदिअरबीयात राहत होता. तरी तीन तारखेला तो रूग्ग हैद्राबाद मार्ग आपल्या मुळ गावी तडखेल येथे आला आहे. पण तशा प्रकारचे काहिच नाहि सदरील रूग्ण तडखेल येथे येऊन तेरा दिवस झाले आहेत पण सद्या त्या रूग्णा मध्ये कोरोना व्हायरस ची कुठल्याहि प्रकारची लक्षणे नाहि आहेत. कोरोना व्हायरसचा एखादा पाॕझेटिव्ह पेशंट असेल तर त्याला चौदा दिवसाच्या आत कोरोनाची सर्व लक्षणे दिसुन येतात. व नंतर तो पेशंट सिरियस होतो त्याला श्वासोश्वासाचा त्रास होतो तिव्र स्वरूपाचा ताप , सर्दि खोकला इत्यादी लक्षणे दिसतात. पण ह्या रूग्णा मध्ये तशा कुठल्याहि प्रकारची लक्षणे नसुन . तो पुर्ण पणे शारिरिक रित्या व्यवस्थित आहे. फक्त तो परदेशातुन आला होता त्यामुळेच त्याची तपासणी करण्यासाठी शासकीय रूग्णालयात आणले होते. त्याची पुर्ण पणे तपासणी करण्यात आली आहे तो पुर्ण पणे व्यवस्थित आहे, सदरील रूग्णाला त्याच्याच घारात सप्रेट रूम मध्ये ठेवण्यास सांगितले आहे. पण जर त्याला कोरोना आजारा सारखे लक्षणे आढळून आले असते तर त्याला शासकीय रूग्णालयात एॕडमिट करूण घेतले असते. पण तो रूग्ण पुर्ण पणे व्यवस्थित आहे. त्यामुळेच देगलूर शहरातील व परिसरातील नागरिकांना आज जे संभ्रम निर्माण झाले आहे तसे काहाच नसुन हि निव्वळ फक्त एक आफवा च आहे तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये व कोणतीही मनात भिती बाळगुनये , स्वच्छता बाळगावी , गर्दि करू नये तसेच निट शिजवलेलेच अन्न खावे असे आव्हान उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी संभाजी पाटील यांनी केले.

तरी भारतात आपण १ ल्या स्टेज मधून २ र्या स्टेज मध्ये जात आहोत. ३ री स्टेज म्हणजे महाभयंकर अशी साथ पसरणे. (भारत सरकारचा प्रयत्न आहे की २ य्रा स्टेजलाच प्रसार थांबला पाहिजे.) परंतु बेशिस्त भारतीय नागरिक साथ देत नाहीत.
चीनने जगाला दाखवून दिले आहे की हा आजार फक्त आणि फक्त कर्फ्यु लावला तरच रोखला जाऊ शकतो. भारतात काय चालू आहे ? अजूनही सर्व शहरे सुरू आहेत, येणे जाणे, दळण वळण चालू आहे. ज्यांना लागण झाली आहेत असले पेशंट हॉस्पिटल मधून पळून जात आहेत (आणि मग इतरांना त्याची लागण करीत आहेत). आपण अजूनही मंगलकार्य, संमेलन, समारंभ, जयंत्या, सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे करणे चालूच ठेवले आहेत. याला जबाबदार स्थानिक प्रशासन असुन प्रशासनाने अशा गर्दिच्या कार्यक्रमांना परवानगी न देता तात्काळ बंदि घालावी . लक्षात घ्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. देशाच्या व तुमच्या , आमच्या भविष्याचा विषय आहे. कृपया हे पण समजून घ्या की लसूण, कापूर, तपकीर, गोमूत्र, ह्या विषाणू ला जास्त तापमानात काही होत नाही (दुबई, सौदी अरेबिया मधून लागण होऊन लोक आपल्याकडे आले आहेत. तिथे काय कमी तापमान आहे ?) आणि इतर अफवा ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. स्वतःची योग्य काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. बाहेर न फिरणे हाच एकमेव उपाय आहे.
सुट्ट्या जाहीर केल्या याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसणे अपेक्षित आहे. भारतासाठी पुढील ३०-४५ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. हा एक युद्धाचा प्रसंग आहे . घरातच थांबून रहा. हात धुणे, तोंडाला रुमाल बांधणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे नाही. सरकार व जागतिक आरोग्य संघटना सांगेल ते पाळणे. तुम्हाला किंवा कोणाला लक्षणे दिसली तर लगेच सरकारी डॉक्टर चे निदर्शनास आणून द्या. स्वताला घरी किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये अलगी करण / विलगी करण कक्षात दाखल व्हा.