Home महत्वाची बातमी मेयो रुग्णालयातुन करोना चे संशयित रुग्ण गेले पळून ,

मेयो रुग्णालयातुन करोना चे संशयित रुग्ण गेले पळून ,

129
0

अमीन शाह/नागपूर

मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले करोनाचे पाच संशयित रुग्ण पळाल्याने खळबळ उडाली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. रुग्ण पळल्याने पोलिस आणि मेयो प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका स्वतंत्र वॉर्डात संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले. मेयो प्रशासनाला ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला.
दरम्यान, चारही रुग्ण घरी असल्याचे कळताच मेयो प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. या चारपैकी तीन रुग्ण नागपुरातील आहेत तर एक रुग्ण चंद्रपूरचा आहे. या सर्व रुग्णांना पुन्हा मेयोत आणले जाणार असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले