Home महत्वाची बातमी फरार अट्टल गुन्हेगार अडकला पोलिसांच्या जाळ्यात

फरार अट्टल गुन्हेगार अडकला पोलिसांच्या जाळ्यात

96
0

भुसावळ : येथील खळवाडी भागातील मनीष रुपेश ठाकरे यास गावठी कट्टा दाखवून ७ हजार रु.रोख जबरीने हिसकावून व दिनदयाल नगरातील दीपाली नामक महिलेस देह व्यापार करून पैसे कमवून दिले नाही म्‍हणुन धमकावून ५ हजार रु.खंडणी मागून चापट बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात दोन गुन्‍हे दाखल करण्यात आले होते.
या दोन्‍ही गुन्ह्यातील फरार आरोपी सलीम उर्फ घोडेवाले सिकंदर शेख रा.दिनदयाल नगर याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपीस भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,संदीप परदेशी,पोहेकाॅ. सुनील जोशी,पोना.रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर,उमाकांत पाटील, महेश चौधरी,पोकाॅ.विकास सातदिवे,श्रीकृष्ण देशमुख,तुषार पाटील,ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली.

लियाकत शाह