Home बुलडाणा सी सी टी व्ही कॅमेरे असणाऱ्या शाळेत सापडल्या कॉपी…!

सी सी टी व्ही कॅमेरे असणाऱ्या शाळेत सापडल्या कॉपी…!

141

उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार यांनी अचानक दिलेल्या भेटीत उलगडले कॉपीचे रहस्य.

केंद्र संचालक म्हणतात त्या कॉप्या डस्टबिन मधल्या तर तहसीलदार आणि उप विभागीय अधिकारी म्हणतात त्या कॉप्या डेक्सच्या मागे सापडल्या गणिताच्या पेपरला गणिताचीच कॉपी सापडणे योगायोग नाही.

अमीन शाह

डोणगांव / बुलडाणा – १ मार्च पासून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत अश्यातच डोणगांव येथील मदन वामन पातूरकर शाळेतील परीक्षा केंद्रावर ३२० विध्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसलेले आहे मात्र १२ मार्च रोजी गणिताच्या पेपरला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मेहकर यांनी भेट दिली असता परीक्षा केंद्रातील एका रूम मध्ये गणिताच्याच कॉप्या सापडल्या.
डोणगांव येथील डोणगांव मेहकर रोडवर स्थित असलेली मदन वामन पातूरकर विद्यालय येथे दहावीचे परीक्षा केंद्र असून या ठिकाणी ३२० विध्यार्थी परीक्षा देतात तर या परीक्षा केंद्रावर प्रत्येक रूम तसेच आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत तेव्हा कोणतीही कृतीवर कॅमेऱ्याची नजर असते तेव्हा या ठिकाणी जर परीक्षेत कॉपी सारखा गैर प्रकार सुरू असेल तर त्याची रेकॉर्डिग सुद्धा कॅमेऱ्यात झालेली असेल तेव्हा या शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून बघितले तर निश्चितच येथे कॉपी सुरू असते की नाही याची शहानिशा होऊ शकते.
मदन वामन पातूरकर विद्यालय येथे १२ मार्च रोजी या परीक्षा केंद्रावर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड व तहसीलदार संजय गरकल यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी एका रुम मध्ये डेक्स च्या मागे दोन कॉप्या सापडल्या विशेष म्हणजे गणिताच्या पेपरला गणित याच विषयाच्या ह्या कॉप्या होत्या त्यात यावर उप विभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी सांगितले की आम्हाला त्या परीक्षा केंद्रावर रुम नंबर पाच मध्ये गेलो असता कचरा कुंडी जवळ सहा पानांची व एक दोन पानांची अश्या कॉप्या सापडल्या याचा अर्थ असा होतो की या शाळेत कॉप्या सुरू होत्या अश्यात आम्ही गेल्यावर त्यांनी त्या कॉप्या फेकून दिल्या असतील तेव्हा आम्ही सी सी टी व्ही फुटेज मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कॉपी सापडल्याचा अहवाल शिक्षण विभागाला पाठवणार.
(आमच्या परीक्षा केंद्रावर कोण्हीही कॉपी पुरवत नाही आणि एखाद्या विध्यार्थ्यांने कॉपी आणली असेल व ती कॉपी कचरा पेटित टाकली असेल -संजय रामेश्वर टेकाळे)