Home मराठवाडा दुप्पट सोन्याचे अमिष देऊन महिलेस लुबाडणारा भामटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

दुप्पट सोन्याचे अमिष देऊन महिलेस लुबाडणारा भामटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

231

नजाकत सययद

जालना , दि. १३ :- दुप्पट सोने करुन देतो म्हणत एका महिलेच्या हातात धातु देऊन तो सोन्याचा आहे असे सांगून महिलेच्या अंगावरील सोन्याच्या पोतीवर आज बस स्थानक गेट नंबर दोन मध्ये हात साफ करुन फसवणूक करणाऱ्या भामटयाच्या मुसक्या तात्काळ अंबड पोलीसांनी आवळुन त्यास गजाआड केल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील राहणारी महिला नामे शोभाबाई बनन पवळ वय 47 वर्ष ही तिच्या पाहुणीच्या लग्नाला निकळंक ता.बदनापुर येथे जाण्यासाठी धाकलगाव येथून खाजगी रिक्षात अंबड पर्यंत आली. व बस स्थानक गेट नं. 2 मधुन पायी आत जात असताना तिच्या पाठी मागुन दोन अज्ञात भामटे तिच्या जवळ गेले. व तीच्या हातात सोनेरी रंगाचा धातु देऊन तो सोन्याचा आहे असे दाखवुन तिच्या गळयात 50 सोन्याचे मनी व दोन डोरले अशी असलेली पोत जिची किमत 15 हजाराची अशी दुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवून ती काढून घेतली. तेव्हा सदर महिलेस सोने म्हणून देण्यात आलेला धातु तिने इतर लोकांना दाखविले असता तो सोन्याचा नसुन धातु असल्याचे तिला सांगितल्याने तिची फसवणुक झाल्याचे तिला समजले. सदर घटणेची माहिती अंबड पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांनी तपासाचे चक्र फिरवून पो.उप.नि.सुग्रीव चाटे, जमादार विष्णु चव्हाण,पोलास कॉन्सटेबल वंदन पवार,संतोष वनवे यांना माहिती काढणे करीता शहरात रवाना केले. त्यांनी गुप्तबातमीदारामार्फत माहिती काढुन फसवणुक करणारा भामटा बंडु लक्ष्मण जाधव रा.बीड ता.जि.बीड यास शहरातील आठवडी बाजारातुन त्याच्या मुसक्या आवळुन त्यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन अंबड येथे आणून त्यास विचारपुस केली असता तो पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी अंबड पोलीसात शोभाबाई भ.बबन पवळ वय 47 वर्ष धाकलगांव ता.अंबड जि.जालना हिच्या फिर्यादवरुन कलम 420,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे करीत आहेत.